Harshawardhan sapkal angry over party failure : विजय वडेट्टीवार उद्धव ठाकरेंना भेटले, तरीही उपयोग झाला नाही
Nagpur चंद्रपूरमध्ये सर्वाधिक नगरसेवक असतानाही महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला. भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार संगीता खांडेकर या अवघ्या एक मताने विजयी झाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे सेनेने गेम केल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चांगलेच भडकले आहेत. याचा परिणाम उद्धव ठाकरे सेनेला परभणी महापालिकेत भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावरून आघाडीत फूट पडणार असल्याचे स्पष्ट झाले असून परभणीतही धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला फक्त ६ अतिरिक्त नगरसेवकांची गरज होती. राज्यात महाविकास आघाडी असल्याने उद्धव ठाकरे काँग्रेससोबत राहतील अशी अपेक्षा काँग्रेस नेत्यांना होती. मध्यंतरी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत यांची भेट घेतली होती. या बैठकीत भाजप सोडून कुणासोबतही आघाडी करण्यात येईल असे उबाठाच्या नेत्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे काँग्रेसचे नेते निश्चिंत होते.
Cabinet meeting : मंत्रिमंडळाचा धडाका; एका बैठकीत 19 महत्त्वाचे निर्णय !
त्यांनी उद्धव ठाकरे सेनेला स्थायी समितीचे सभापतिपद देऊ केले होते. मात्र उबाठाचे जिल्हाध्यक्ष व महानगर पालिकेचे गटनेते संदीप गिऱ्हे यांनी महापौरपदाची मागणी केली होती. मात्र यास काँग्रेसचा नकार होता. हीच बाब हेरून भाजपने उबाठाला आपल्याकडे वळवले. उद्धव ठाकरेला उपमहापौरपद आणि स्थायी समितीचे सभापती देण्याचे भाजपने मान्य केले. एवढेच नव्हे तर महापौरपदाचा हट्ट सव्वा वर्षानंतर पुरवला जाईल असा शब्दही दिला.
काँग्रेसपेक्षा चांगली ऑफर चालून आल्याने शेवटी उद्धव ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी भाजपसोबत जाणे पसंत केले. काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांनी अपक्षांना सोबत घेऊन ३२ मतांची जुळवाजुळव केली होती. बहुमतासाठी एकाच नगरसेवकाची गरज होती. मात्र भाजपने उबाठाची सहा मते आपल्याकडे वळवली. त्यांच्यासोबत असलेल्या वंचितच्या दोन नगरसेवकांनी अनुपस्थित राहण्याचा तर एमआयएमचा एका सदस्याने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. तो भाजपच्या पथ्यावर पडला.
भाजपने २३ नगरसेवकांवरून थेट ३३ पर्यंत उडी मारली. उद्धव ठाकरे सेना काँग्रेससोबत राहिली असती तर भाजप उमेदवाराचा पराभव अटळ होता. काँग्रेसचा महापौर चंद्रपूर बसला असता. चंद्रपूरमध्ये सत्तास्थापनेसाठी जशी काँग्रेसला उद्धव ठाकरे सेनेची गरज आहे तशीच परभणीच परभणीमध्ये उद्धव ठाकरे सेनेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परभणीत उद्धव ठाकरे सेनेला बघून घेऊ असाच अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहे. हे बघता सत्तेच्या जवळ असलेल्या उद्धव ठाकरे सेनेत खळबळ उडाली आहे. परभणीतही धक्कादायक निकालाची शक्यता वर्तविली जात आहे.








