Chandrashekhar Bawankule : चोरांसाठी Bad News! पोलीस स्टेशनची संख्या वाढणार

Create more new police stations in the district : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना

Nagpur नागपूर शहर आणि जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन आता पोलीस स्टेशनची संख्याही वाढणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात बैठकीमध्ये सूचना दिल्या. वाढती लोकसंख्या आणि परिसराचा विस्तार लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था कायम राखणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस ठाण्यांची संख्या वाढवा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे आता भुरट्या चोरांचे टेंशन वाढणार आहे.

वाढीव पोलीस ठाण्यांसाठी मनुष्यबळाची व्यवस्था करा. जेणेकरुन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस दल तत्पर राहील. असंही चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांना म्हणाले. त्यांनी विविध शासकीय अधिकाऱ्यांची विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीस प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधुरी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपस्थित होते.

Rape case registered : १३ वर्षांची मुलगी म्हणाली, ‘पोटात दुखतय’, डॉक्टर म्हणाले, Pregnant आहे!

नागपूर शहर व परिसरात वाढती लोकसंख्या लक्षात घेता गुन्हेगारीला आळा घालणे आवश्यक आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस विभागाच्या नागपूर ग्रामीण, शहर व आयुक्तालयाच्या हद्दीत नव्याने पोलीस स्टेशन उभारण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करावा. तो शासनास सादर करावा, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. तसेच पोलिसांना विविध उपक्रम राबविण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.

Nagpur Police : कारने Stunt केला, पोलिसांनी शोधून काढले, गुन्हा दाखल!

ग्रामीणमध्ये सहा नवीन पोलीस ठाणे
नागपूर जिल्ह्यात आणखी ६ नवे पोलीस ठाणे बनविण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मांडला. त्यामुळे येत्या काही दिवसांत गृहमंत्रालयात पोलीस ठाण्यांच्या वाढीसंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार ग्रामीण पोलीस विभागात नव्या सहा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे.