Breaking

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा महसूल अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

Disciplinary action for misconduct in field visit : क्षेत्रीय भेटीत कुचराई केल्यास शिस्तभंगाची कारवाई

Nagpur राज्यातील महसूल यंत्रणा लोकाभिमुख करण्यासाठी महसूल मंत्री व नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर पाऊल उचलले आहे. त्यांनी परिपत्रक जारी करून जिल्हाधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी दोनवेळा आपल्या क्षेत्रात दौरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामात कोणी कुचराई केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराच दिला आहे.

महसूल मंत्री बावनकुळे यांनी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परिपत्रकाबद्दलची संपूर्ण माहिती दिली. जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात मुख्यमंत्र्यांच्या या संदर्भातील निर्देशांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. या भेटीदौऱ्यांचे मॉनिटर करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली तयार करायची आहे. त्याद्वारे दौऱ्याचे नियोजन करून विभागीय आयुक्त कार्यालयाने या संदर्भात समन्वय राखावा अशा सूचना दिल्या आहेत.

Bogus Crop Insurance : बनावट पीकविमा अर्ज कराल तर आधार कार्ड ब्लॉक करणार

महसूल अधिकाऱ्यांना क्षेत्रीय भेटींचा १३ कलमी कार्यक्रम अधिकाऱ्यांना आखून देण्यात आला आहे. महसूल अधिकाऱ्यांनी भेटी देऊन, पाहणी करून जनतेशी संवाद साधून जनतेचे अभिप्राय नोंदवावेत. नैसर्गिक आपत्तीप्रवण भागात आपत्ती काही टाळता येईल याची उपाययोजना करून मंत्रालयास सूचना करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच गावपातळीवर कर्मचारी व अधिकारी कामकाज करत आहेत की नाही याची खातरजमा आकस्मिक भेटी देऊन करावी. या भेटी देताना ई-ऑफिस प्रणाली, सेवाहक्क कायदा पोर्टल, आपले सरकार पोर्टल, पीजी पोर्टल, इम्युटेशन, ई-पीकपाणी तसेच, सेतू कार्यालयासहित महसूल विभागातील सर्व ऑनलाइन सेवांचा वापर कटाक्षाने केला जातो की नाही याचा आढावा घ्यावा. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Social Responsibility : मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या संस्थेसाठी पुढे आले महिला मंडळ

जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणा त्यांच्या भागात फिरस्तीवर असली पाहिजे हा यामागचा उद्देश आहे. विभागीय आयुक्तांनी पाठवलेल्या अहवालावर आपण स्वतः लक्ष देणार असून, त्याची नोंद सेवापुस्तिकेत घेतली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले आहे.