Breaking

Chandrashekhar Bawankule : कारवाईसाठी मी स्वतः प्रयत्न करेन !

I will try to take action myself : सर्वांनी नागपूरमधील अजब बंगल्यामध्ये जाऊन वाघनख बघितली पाहिजे

Nagpur : शिवजयंतीनिमित्त आज (१९ फेब्रुवारी) आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये प्रशासनातील सर्व अधिकारी सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जनता रस्त्यावर आलेली आहे. नागपूरसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेसाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने राज्य चालत आहे. महाराजांचा इतिहास जपणे आणि त्यांचे विचार घेऊन पुढे जाणारे लोक आहेत. योग्य रीतीने काम करण्याची ऊर्जा आजच्या दिवशी मिळते. ही ऊर्जा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. कमाल खानच्या विकिपिडीया पोस्टबद्दल मी नंतर बोलेन, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. पण त्यावर कारवाई झाली पाहिजे, यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन, असेही ते म्हणाले.

Crime in Nagpur : पाळत ठेवली तेव्हा कळले तो दोन मुलांचा बाप आहे!

सर्वांनी नागपूरमधील अजब बंगल्यामध्ये जाऊन वाघनख बघितली पाहिजे, असे सांगताना राज्यात सुरू असलेली कुठलीही योजना बंद होणार नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शिवभोजन असो की लाडकी बहीण. काही लोकांनी हैदोस घालून त्या योजनांचा गैरफायदा घेतला. त्या व्याख्येत जे लाभार्थी बसत नाही ते कमी करावे लागणार आहेत. नियमात असणाऱ्या प्रत्येकाला लाभ मिळणार आहे. सरकारकडे पैसा कमी नाही. आमचे सरकार कुठलीही योजना बंद करणार नाही, असे मंत्री बावनकुळे म्हणाले.

विकसित महाराष्ट्रासाठी सोबत या. आमच्यासोबत काम करा आणि महाराष्ट्राला पुढे न्या, या भूमिकेतून आम्ही काम करत आहोत. त्यासाठी १ कोटी १६ लाख लोकांनी भाजपची प्राथमिक सदस्यता घेतली आहे. मोठा पक्ष म्हणून आम्ही काम करत आहोत. सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने ज्याच्या बाबी होत्या, त्याचे उत्तर आम्ही दिलेले आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकर लागेल. येणाऱ्या काळात निकाल आल्यावर राज्य निवडणूक आयोग निवडणुका जाहिर करेल. स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य नसल्याने विकासाला बाधा निर्माण होते आहे. तातडीने निवडणुका लागल्या पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे.

Wardha Police : तो म्हणाला, मी चमत्कार करतो… त्यांनी ११२ नंबर डायल केला!

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. यावर हा अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांचा ते सोडवतील, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी व्हावी म्हणून चौकशी सुरू आहे. काही लोक भडकवण्याचे काम करत आहेत, ते त्यांनी थांबवावे. याकडे राजकारण म्हणून बघू नये. सरकारच्या चौकशीला सगळ्यांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.