Chandrashekhar Bawankule : शासनावरील विश्वास वाढवण्याचा प्रयत्न

Maharajswam Abhiyan will now be implemented in all over state : प्रत्येक मंडळात ‘महाराजस्व अभियान’; पालकमंत्र्यांची माहिती

Amravati राज्य शासनाने पारदर्शक आणि गतीमान प्रशासन धोरण स्वीकारले असून, शासकीय कार्यालयातील कामे सहज, विनातक्रार आणि जलदगतीने पार पाडण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आता प्रत्येक मंडळात ‘महाराजस्व अभियान’ राबविले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे उद्घाटन आज पार पडले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवि राणा, प्रविण तायडे, राजेश वानखडे, माजी खासदार नवनीत राणा, माजी मंत्री सुनिल देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी केले सभापतींचे कौतुक

यावेळी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, “नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध पावले उचलत आहे. नागरिकांच्या अर्जांवर मंडळ स्तरावरच निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. प्रशासनाच्या सहकार्याने जनतेचे कल्याण साधण्याचा संकल्प केला आहे.”

ते पुढे म्हणाले, “शासनावरील विश्वास वाढवण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जात आहे. अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. अमरावती विमानतळाचा विस्तार व धावपट्टी वाढविणे, पायलट प्रशिक्षण केंद्र, आयटी पार्क, पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क लवकरच पूर्ण होणार आहेत.”

Chandrashekhar Bawankule : आता तरी राहुल गांधींचं डोकं ठिकाणावर आलं पाहिजे !

“याशिवाय, अमरावतीसाठी पिण्याच्या पाण्याच्या दीर्घकालीन योजनेंतर्गत पुढील ५० वर्षांसाठी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, शेतकऱ्यांना मोफत वीज, लाडकी बहिण योजना व मेळघाटातील रस्ते जोडणीसाठी सरकारने ठोस पावले उचलल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

कार्यक्रमात खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार रवि राणा यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार विजय लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध बचतगटांना स्वनिधी निधी, ट्रॅक्टर, कृषी अवजारे, तीनचाकी सायकल, विहिरीच्या कार्यादेशांचे वाटप करण्यात आले.