Breaking

Chandrashekhar Bawankule : भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही मिळणार रेशन

VJNT community will get ration anywhere in the state : जात प्रमाणपत्र आणि आधारकार्डही देण्याचा महसूलमंत्र्यांचा निर्णय

Mumbai भटके विमुक्त समाजाला आता राज्यात कुठेही रेशन मिळू शकणार आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे राज्यभरातील व्हीजेएनटी समाजाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.

भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करावे. तसेच या समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग दुकानातून धान्य उपलब्ध करावे. यासह १५ मागण्यांबाबतचे निर्णय बावनकुळे यांनी घेतले.

Youth Congress : कुणाल राऊत म्हणतात, व्हेंडरने दिली राजकीय कारकिर्द बरबाद करण्याची धमकी

भटके विमुक्त समाजातील विविध प्रश्नांवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. बैठकीला महसूलमंत्र्यांसह भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे तसेच भटके विमुक्त समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘भटक्या समाजातील लोकांच्या अडचणी समजून घेऊन १५ प्रश्न तातडीने मार्गी लावले आहेत. गतवर्षी भटक्या समाजाच्या तांड्यावर दिवाळी साजरी केली होती. त्यांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावला. त्यामुळे राज्यभरात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गायरान जमीनीवर भटके समाजाची वस्ती आहे. याबाबत पंधरा दिवसात आराखडा सादर करावा. त्यांचाही प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येईल,’ असं बावनकुळे म्हणाले.

BJP District Presidents : नवे जिल्हाध्यक्ष म्हणतात, ‘स्थानिक निवडणुका भाजपच जिंकणार’

बैठकीत झालेले निर्णय

जात प्रमाणपत्र गृहभेटी आधारावर देण्यात येणार
शाळा, महाविद्यालयात मंडणगड पॅटर्नप्रमाणे जात दाखले द्यावेत
१९६१ पूर्वीचे जात कागदपत्र नसणाऱ्यांना गृहचौकशी आधारे जात प्रमाणपत्र द्यावे
भटकंती करणाऱ्या व्यक्तींना नायब तहसिलदारामार्फत ओळखपत्र द्यावे
विविध दाखले देण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात यावे
१९५२ चा सवयीचा गुन्हेगार कायदा रद्द करण्याबाबत प्रस्ताव द्यावा
आधारकार्डसाठी कागदपत्रांचा पर्याय देण्यात यावा
तात्पुरते रेशनकार्ड देण्याऐवजी कायमस्वरुपी देण्यात यावे
सरकारी किंवा खासगी जमीनीवर वसलेल्या भटके समाजाचे सर्वेक्षण करावे
भटक्या समाजाला रेशनकार्ड देण्यात यावे
भटक्या समाजाचे जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार
जागा वाटपासाठी वस्तीनिहाय यादी सादर करावी
अन्याय अत्याचार प्रतिबंधक व संरक्षण समितीची स्थापना करुन तिची बैठक घेणार
भटके विमुक्तांना कसण्यासाठी पट्टे उपलब्ध करुन देणार