Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला, म्हणाले..

Chandrashekhar Bawankule’s advice to Uddhav Thackeray : भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणाऱ्या लोकांच्या विरोधात आम्ही आहो

Nagpur : उद्धव ठाकरे यांना पुढचं भविष्य दिसत नाही. त्यामुळे ते सध्या एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदेंना डीवचलं तर ते दूर होऊन ठाकरेंसाठी स्पेस निर्माण होईल, म्हणून ते टीका करत असल्याचा पालटवार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही आम्ही पक्ष वाढवण्यासाठी काम केले. त्याचे रिझल्टही आम्हाला मिळाले. उद्धव ठाकरे यांचा पक्ष रोज फुटत आहे. अनेक लोक सोडून गेलेले आहे. अजूनही सोडून जात आहेत. त्यांचा राहिलेला कार्यकर्ता सांभाळण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्यापेक्षा आपला कार्यकर्ता का पक्ष का सोडत आहे, याचा विचार केला पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.

Dr. Sanjay Kute : MIDC थांबवेल बेरोजगारांचे स्थलांतर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होणार आहे. संघ मुख्यालय, दीक्षाभूमी त्यानंतर माधव नेत्रालय आणि डिफेन्सचा दारुगोळा निर्माण करणाऱ्या सोलार कंपनीला ते भेट देणार आहेत. भाजपकडून प्रत्येक चौकात मोदीजींचे स्वागत केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा सर्व देशवासीयांना दिल्या आहेत. भाजपच्या मायनॉरिटी कमिटीने रमजानच्या निमित्ताने कार्यक्रम राबवला आहे. भाजपच्या अल्पसंख्यांक मुस्लिम मोर्चाच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवला जात आहे. आम्ही मुस्लिम विरोधी लोक नाही, हे बावनकुळे यांनी आवर्जून सांगितले.

Farmer Suicide : अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली

भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणाऱ्या लोकांच्या विरोधात आम्ही आहो. उद्धव ठाकरेंच्या नाशिक आणि परभणीच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकत होते. त्यांच्याविरोधात आमची भूमिका आहे. पाकिस्तान मॅच जिंकल्यानंतर भारतात राहून फटाके फोडणारे जे लोक आहेत, त्यांच्या विरोधात आहोत. सर्व मुस्लिम विरोधी आम्ही नाही. राज्यात हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये भाऊबंदकी आहे. या देशाचं रक्ताच असं आहे की सर्वांना सोबत घेऊन आम्ही चालतो, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.