Breaking

Chandrashekhar Bawankule : कामठीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरसावले गडकरी!

Gadkari’s big initiative to solve the problem of traffic congestion in Kamthi : वर्षानुवर्षाची समस्या सूटण्याचा बावनकुळेंनाही विश्वास, नागपूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी

Nagpur : नागपूर – जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग राज्याचे महसूल मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ असलेल्या कामठीमधून जातो. वाढत्या अतिक्रमणामुळे हा रस्ता केवळ सात मिटर येवढाच राहिला आहे. येथे लोकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यातच सध्या ऑटोमॅटीव्ह चौक ते कन्हान या मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे तर वाहतूक कोंडी अधिकच वाढली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यामध्ये हा मार्ग १८ मिटर रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गडकरींच्या पुढाकारामुळे वर्षानुवर्षांची समस्या सुटणार आहे.

या निर्णयामुळे कामठीच्या विकासाला चालना मिळाली आहे. जिल्हा प्रशासन, नगर परिषद आणि मेट्रो संयुक्तपणे अतिक्रमण काढणार आहे. १९१२-१३च्या सर्वेनुसार या रस्त्याची १८ मिटर मोजणी करून अतिक्रमण काढले जाणार आहे. कामठीत साकारल्या जाणाऱ्या व्यापारी संकुलात व्यावसायीक गाळे उपलब्ध होणार आहेत. बस स्टॉप, नगर परिषद आणि तहसील कार्यालय परिसरात साकारणाऱ्या मेट्रो स्टेशनला लक्षात घेऊन या ठिकाणी नझूलच्या जागेवर भव्य व्यापारी संकुल उभारण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Adivasi Pardhi Vikas Parishad : पारधी समाजाची घरे पूर्वसूचना न देताच पाडली, स्वप्नांचा चुराडा

या बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या ग्रामीण भागातील विविध मार्गाबाबत चर्चा करण्यात आली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निधीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी करुन ग्रामीण भागातील या रस्त्यांसाठी लक्ष वेधले. यात खरांगना – कोंढाळी – काटोल-सावरगाव-वडचिचोली या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देणे, मौदा – माथनी चापेगडी कुही या राज्य महामार्गास निधी उपलब्ध करुन देणे, कारंजा-लोहारीसावंगा-भारशिंगी – खरसोली- नरखेड-मध्यप्रदेश सिमेपर्यंत या राष्ट्रीय महामार्गाच्या डी.पी.आर.ला मंजूरी देणे.

नागपूर-छिंदवाडा राष्ट्रीय महामार्गावर निर्माणधीन उड्डाणपूलावरुन कोराडी नाक्यापासून ऑर्चिड शाळेकडे जाण्याकरीता रस्त्याचे बांधकाम करणे, श्री कोराडी महालक्ष्मी मंदिर अंतर्गत श्री महादेव टेकडी ते हनुमान मंदिर (१५१ फुट) या ठिकाणी रोप-वे च्या कामाकरीता निधी उपलब्ध करुन देणे, दहेगाव-कामठी-अजनी बडोदा-कुही या राष्ट्रीय महामार्गास निधी उपलब्ध करुन देणे, गोंडखैरी भंडारा बाहय वळण मार्गावरील सर्व्हिस रोड आणि पांजरा येथील मुख्य चौकातील रस्त्याचे बांधकाम करणे आदी मार्गांबाबत प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : एक हजार चौरस फूट जमिनींना मान्यता देण्यासाठी नवीन एसओपी !

बैठकीला आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, चरणसिंह ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता नंदनवार व इतर अधिकारी उपस्थित होते.