odisha-rajyasabha-election-bjp-wins-three-seats : पाच दिवसांपासून ठोकला होता तळ, जुळवाजुळव करण्यात यश
Nagpur महाराष्ट्राची विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणूक भाजपला जिंकून दिल्यानंतर राज्याचे महसूलमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाने ओडिसा राज्यातील राज्यसभेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या नेतृत्वात भाजपने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणारे चंद्रशेखर बावनकुळे यांची राजकीय रणनीती यशस्वी ठरली. दोन उमेदवार जिंकून येतील एवढेच मताधिक्य असतानाही भाजप पुरस्कृत तिसरा उमेदवारही विजयी झाला आहे.
ओडिशामध्ये भाजपचे सरकार असून त्यांच्याकडे ८२ आमदारांचे बळ आहे, तर विरोधकांकडे ६५ आमदार आहेत. ४ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत एकूण ५ उमेदवार रिंगणात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल आणि विद्यमान राज्यसभा सदस्य सुजित कुमार हे अधिकृत उमेदवार होते, तर माजी राज्यमंत्री दिलीप राय हे भाजप समर्थित उमेदवार होते. संख्याबळानुसार भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकत होते, मात्र तिसऱ्या जागेसाठी अतिरिक्त मतांची गरज होती.
Mla land mafia : सरकारी पत्रात ‘भूमाफिया’ असा उल्लेख; भाजप आमदार नरेंद्र मेहता प्रकरण
बावनकुळे यांनी आखलेल्या अचूक व्यूहरचनेमुळे भाजपला अपक्ष आणि इतर मतांची जुळवाजुळव करण्यात यश आले आणि तिन्ही उमेदवार विजयी झाले. गेले पाच दिवस चंद्रशेखर बावनकुळे ओडिशामध्ये तळ ठोकून होते. त्यांनी प्रत्येक आमदाराशी वैयक्तिक चर्चा करून आणि पक्षप्रमुखांसोबत बैठका घेऊन ही रणनीती पूर्णत्वास नेली. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असताना बावनकुळे यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक झाली होती.
Mahavitaran : थकबाकीदार शासकीय कार्यालये महावितरणच्या रडारवर
राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यात आले. दुसऱ्या क्रमांकाचे महसूल खाते बावनकुळे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी भाजपने रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केली. असे असताना नगरपालिका आणि महानगर पालिकेच्यी निवडणुकीसाठी भाजपने बावनकुळे यांनाच पुढे केले होते. या दोन्ही निवडणुकीत दमदार कामगिरी करून भाजप राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे.








