व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar Bawankule : जाहिरात कुणीही छापो, ह्यांच्या पोटात का दुखतंय ?

Chandrashekhar Bawankule : जाहिरात कुणीही छापो, ह्यांच्या पोटात का दुखतंय ?

Who Gets Uneasy When Fadnavis is in the Spotlight : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जाहिरातींवर किती पैसा खर्च केला ?

Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गणेशोत्सवानिमित्त ‘देवा भाऊ’ ही जाहिरात प्रचंड चर्चेत आली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या जाहिरातींवर टीका केली आहे. या दोघांनाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तगडे उत्तर दिले आहे.

नागपुरात आज (७ सप्टेंबर) पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, जाहिरात कुणीही छापली असेल तर रोहित पवारांना काय प्रॉब्लेम आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल एखादी जाहिरात छापून आली तर काहीही हरकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तव्यनिष्ठतेसाठी कुणीही त्यांची जाहिरात दिली, तर संजय राऊत यांच्या पोटात का दुखतंय? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा जाहिरातींवर किती खासगी पैसा खर्च झाला, याचा हिशोब त्यांनी काढला का? देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कर्तव्याप्रती जाहिरात खासगी व्यक्ती देवो की सरकार, त्यांच्या पोटात दुखायला नको.

Maratha reservation : ड्राफ्ट आधीच माहीत होता, अजेंड्यानुसार समाज वेगळा पाडला

मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयात जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे अधिकार अबाधित आहेत. शासन आपली बाजू मांडणारच आहे. ओबीसींचे पदाधिकारी न्यायालयात जाण्याचे म्हणत आहेत. शेवटी न्यायालयीन लढाई झालीच, तर शासन आपली बाजू योग्य पद्धतीने मांडेल, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. गणेशोत्सवामध्ये पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवला. त्यामुळे गणेश विसर्जन सर्वत्र शांततेत पार पडले. मराठा आंदोलनामध्ये मुंबईत पोलिस शांतपणे आंदोलनाला सामोरे गेले. यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केले.

error: Content is protected !!