Chief Minister Youth Work Training Scheme : 3 हजार 211 प्रशिक्षणार्थ्यांना 11 कोटी 87 लाखाचे विद्यावेतन

 

11 Crore 87 Lakhs for 3211 trainees : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ठरतेय प्रभावी

Yavatmal राज्यातील असंख्य युवकांना आपले शिक्षण पुर्ण करुन नोकरीसाठी अनुभवाच्या शोधात फिरावे लागते. युवकांना विद्यावेतनासह घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी आणि शासकीय तसेच खाजगी आस्थापनांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत 3 हजार 211 प्रशिक्षणार्थी विविध संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना आतापर्यंत 11 कोटी 87 लाखाचे विद्यावेतन देण्यात आले आहे.

योजनेंतर्गत प्रशिक्षण कालावधीत बारावी पास विद्यार्थ्यांना प्रतिमहा 6 हजार रुपये, आयटीआय, पदविका उत्तीर्ण युवकांना 8 हजार रुपये व पदविधर, पदव्युत्तर युवकांना 10 हजार रुपये असे विद्यावेतन दिले जात आहे. हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने दरमहा अदा केले जात आहे.

Dr. Pankaj Bhoyar: आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रयत्न

 

या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के, सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के व केंद्र आणि राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापणा, उद्योग महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या 5 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेण्याची मुभा होती. त्यामुळे संस्थांनी प्रशिक्षणार्थ्यांनी निवड करून त्यांना नियुक्ती आदेश दिले होते. योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी घेण्यासाठी उद्योग, आस्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी अशी अट होती.

उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 35 वर्ष, उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा. त्याची आधार नोंदणी व बँक खातेही आधारशी संलग्न असावे, अशा अटी होत्या. योजनेची घोषणा झाल्यानंतर अनेक इच्छूक युवकांनी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्याप्रमाणे पात्र युवकांची निवड करून संबंधित शासकीय संस्था, आस्थापना, उद्योजकांनी युवकांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू करून घेतले होते.

Mahakumbh : वर्धेच्या कन्येने प्रयागराजमध्ये उभारले २६ डोम!

योजनेंतर्गत जिल्ह्यातील नियुक्ती दिलेल्या पात्र उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेप्रमाणे विद्यावेतन दिले जात आहे. जिल्ह्यात विविध 287 शासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये एकून 3 हजार 211 प्रशिक्षणार्थी कार्यरत आहे. या प्रशिक्षणार्थ्यांना आतापर्यंत 11 कोटी 87 लाख रुपयांचे विद्यावेतन देण्यात आले आहे