Chikhli APMC : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आर्थिक विस्कळीतपणा

Salaries stalled for 7 months; employees’ anger erupts : ७ महिन्यांपासून वेतनठप्प; कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला

Chikhli कृषी उत्पन्न बाजार समिती (कृउबास), चिखली येथील कर्मचाऱ्यांचे मे ते नोव्हेंबर २०२५ या सात महिन्यांचे वेतन थकले असून, कर्मचाऱ्यांच्या घरगुती अर्थकारणावर मोठा आघात झाला आहे. वाढती महागाई, बँक हप्ते आणि शिक्षणखर्च या सर्व ताणात बाजार समितीने वेतन रोखून ठेवताच कर्मचाऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

कर्मचारी धनराज रामभाऊ शिंपणे यांनी ९ डिसेंबर रोजी अध्यक्ष व सचिवांना निवेदन देऊन थकीत वेतन तातडीने मंजूर करण्याची मागणी केली. निवेदनात त्यांनी नमूद केले, महागाईच्या काळात वेतन न मिळाल्याने कुटुंब उद्‌ध्वस्त स्थितीत ,मुलांचे शिक्षण, बँक हप्ते, दैनंदिन खर्च हाताळणे अशक्य, बजेट असतानाही वेतन रोखणे अयोग्य कर्मचाऱ्यांत प्रखर नाराजी असून हे सर्व जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Mahayuti Government : युती सरकारच्या शाळाबंदी धोरणाचा थेट फटका मुलींना

सात महिन्यांपासूनचा वेतनप्रश्न बाजार समितीत प्रलंबितच आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे, “जानेवारी २०२५ पूर्वी थकीत वेतनाचा एकरकमी निर्णय द्या, अन्यथा तीव्र आंदोलन अपरिहार्य!” कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची प्रत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलडाणा यांच्याकडेही पाठवली असून तातडीच्या तपासणीची मागणी केली आहे.

Local Body Elections : तिकिट हवी तर भाजपचीच, इच्छुकांची गर्दी वाढली

प्रशासनाचा निष्क्रीय कारभार, आर्थिक व्यवस्थापनातील त्रुटी आणि कर्मचाऱ्यांचे ७ महिन्यांचे वेतन रोखणे — हे सर्व मिळून कृउबासमधील आर्थिक दुर्लक्ष आणि गैरव्यवस्थेचे गंभीर द्योतक असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासनाकडून तातडीने प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलन पेटण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.