The Election Commission should conduct fair elections : चिखली काँग्रेसने दिले तहसिलदारांना निवेदन
Buldhana काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दाफाश करण्याची मोहीम हाती घेतली आहे. नुकत्याच राज्यात संपन्न झालेल्या विधानसभेच्या निकालावर मतदारांचा विश्वास उरलेला नाही. आपले मतदान चोरले गेल्याची भावना निर्माण झाल्याचे जनतेत पाहवयास मिळत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निःपक्ष निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी चिखली काँग्रेसने केली आहे.
निवडणूक आयोगाने लोकशाहीचे रक्षण ठेवण्यासाठी. मतदानाचा आदर तसेच मतदारांची निवडणुक प्रक्रीयेतील विश्वासार्हता अबाधीत राहावी म्हणुन निवडणुक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष निवडणुका घ्याव्यात, असं काँग्रेसने म्हटलं आहे. अशा स्वरूपाचे निवेदन चिखली काँग्रेसच्या वतीने विद्यमान तहसिलदार यांना देण्यात आले.
RPI demands to Makrand Patil : रिपाई आठवले गटाला सन्मानाची वागणूक द्या
राज्यात नोव्हेंबर 2024 मध्ये विनधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक मानले जात आहेत. निकाल अविश्वसनीय वाटत आहेत. काहीतरी गडबड असल्याचे दिसत आहे. राज्यातील राजकीय परिस्थीती ही सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती. सहा महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. अवघ्या सहा महिन्यांत हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही, असं निवेदनात म्हटलं आहे.
Archaeological Department : भोन येथील बौद्ध स्तुपाच्या संवर्धन कार्याला गती
मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला. याविरोधात निवडणुक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याच्या अंतरात तब्बल 50 लाख मतांची वाढ कशी झाली? मतदानाच्या दिवषी संध्याकाळी 5 वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यामध्ये मोठी तफावत आहे, याकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले.
यातही 76 लाख मतदान वाढलेले दाखवले आहे. सर्व मतदान केंद्रावर सी.सी.टि.व्ही. कॅमे-यांची व्यवस्था होती. त्यामुळे मतदार याद्यातील घोळ, रात्रीच्या अंधारात वाढलेले 76 लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली. मात्र आजपर्यंत ही माहीती देण्यात आलेली नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
Vidarbha Farmers : कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको !
यावेळी, प्रा. राजु गवई सर, प्रदिप पचेरवाल, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अमोल लहाने, युवक काँग्रेसच अध्यक्ष रिक्की काकडे, राजु रज्जाक, कैलास खराडे, जाकीर भाई, जक्का भाई, व्यंकटेश रिंढे, मोहमंद साहील, अशोक पडघान एलआयसी, मोहमंद अहमद रजा, शेख एजाज, शकील भाई, शेख हरून भाई, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.