Breaking

Child labor law : बालकामगार कायदा केवळ कागदावरच; उपाययोजना अपयशी !

Rescue of three child laborers from brick kiln : वीटभट्टीवरील तीन बालकामगारांची सुटका

Akola राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा कृती दलाकडून बालमजुरीविरोधात मोहिम राबवली जात आहे. त्याअंतर्गत गांधीग्राम–चोहोट्टा बाजार रस्त्यावरील एका वीटभट्टीत काम करत असलेल्या तीन बालकामगारांची सुटका करण्यात आली. जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष अजित कुंभार यांच्या निर्देशानुसार आणि कामगार उपायुक्त नितीन पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ३१ मार्चपर्यंत जिल्हाभरात अशी मोहीम सुरू राहणार आहे.

गांधीग्रामजवळील वीटभट्टीत सुमारे १४ वर्षे वयाच्या तीन अल्पवयीन मुलांना विटा उचलण्याचे काम करताना आढळून आले. कृती दलाने त्वरित त्यांची सुटका करून समुपदेशन केले. त्यामधील दोन बालके मध्यप्रदेशातील, तर एक बालिका अकोला जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.

A case of suicide due to online games : तरुणीने जर्मन भाषेत लिहिली ‘सुसाईड नोट’!

दहीहंडा पोलीस ठाण्यात वीटभट्टी मालकाविरुद्ध अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 आणि भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुटका केलेल्या तिन्ही बालकांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीने त्यांच्या पालकांना ताकीद देत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हमीपत्र लिहून घेतले.

MoS Pankaj Bhoyar : गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्यमंत्र्यांचा सीसीटीव्हीवर भर

 

 

या मोहिमेत सहायक कामगार आयुक्त राहुल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम श्रेणी दुकान निरीक्षक अर्चना कांबळे, अमर खेतकडे, सुरेंद्र लोखंडे, सोमनाथ पिंपरे, नवनाथ कोकाटे, धनश्री तायडे आणि ‘आयएसडब्ल्यूएस’चे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, समन्वयक सपना गजभिये यांनी सहभाग घेतला.

कामगार उपायुक्त नितीन पाटणकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. कोठेही बालकामगार आढळल्यास त्वरित ‘चाइल्डलाइन 1098’ किंवा ‘पोलीस हेल्पलाइन 112’ वर संपर्क साधावा, असे म्हटले आहे.