व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir mungantiwar : चमन मेटॅलिक्सची मुजोरी खपवून घेणार नाही, सुधीर मुनगंटीवारांचा कंपनीला...

Sudhir mungantiwar : चमन मेटॅलिक्सची मुजोरी खपवून घेणार नाही, सुधीर मुनगंटीवारांचा कंपनीला फायनल इशारा!

sudhir-mungantiwar-directives-chaman-metallics-tadali-pollution-workers-relief : जल-वायू प्रदूषण थांबवण्यासोबत, कामगारांच्या मागण्या तत्काळ सोडवण्याचे निर्देश

Chandrapur : ताडाळी येथील ‘चमन मेटॅलिक्स प्रा. लि.’ कंपनीकडून होत असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास आणि कामगारांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि स्थानिकांना डावलणाऱ्या कंपन्यांची गय केली जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत कंपनी प्रशासनाला सुनावले. जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात आयोजित बैठकीत मुनगंटीवार यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला.

चमन मेटॅलिक्समधून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नदी-नाले विषारी झाले असून, कंपनीच्या धुरामुळे लगतच्या शेतीचे अपरिमित नुकसान होत आहे. स्थानिकांच्या आरोग्यावरही याचे विपरीत परिणाम होत असल्याचे बैठकीत समोर आले. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येत्या १६ एप्रिल रोजी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत प्रदूषण नियंत्रण मंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाईचे संकेत मुनगंटीवार यांनी दिले आहेत. कंपनीमध्ये स्थानिक तरुणांना डावलून परप्रांतीय कामगारांची मोठ्या प्रमाणावर भरती केली जात असल्याचा मुद्दा बैठकीत गाजला. यावर संताप व्यक्त करत मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या आगामी दौऱ्यात कंपनीतील सर्व कामगारांची माहिती तपासली जाईल. ज्या कंपन्या जमिनी इथल्या घेतात, त्यांनी इथल्याच भूमिपुत्रांना रोजगार दिला पाहिजे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

Sudhir mungantiwar : नांदेडच्या भाविकांची मुनगंटीवारांकडे धाव; हस्तक्षेपाने सुटला प्रश्न

अपघाती मृत कामगाराच्या कुटुंबाला १० लाखांची मदत – चमन मेटॅलिक्स अंतर्गत येणाऱ्या ‘वीनस’ कंपनीत नोव्हेंबर २०२५ मध्ये चंद्रकांत कासवटे या कामगाराचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र, अनेक महिने उलटूनही कंपनीने या कुटुंबाला छदामही दिला नसल्याची संतापजनक बाब समोर आली. मुनगंटीवार यांनी यावरून कंपनी प्रतिनिधींना चांगलेच धारेवर धरले. संबंधित कुटुंबाला रुग्णालयाचा संपूर्ण खर्च आणि किमान १० लाख रुपयांची आर्थिक मदत तत्काळ देण्याचे आदेश त्यांनी दिले.

Sudhir Mungantiwar: चंद्रपूरच्या विकासाचा बुलंद आवाज: विधानसभेत मुनगंटीवारांचा ‘परिणामकारक’ लढा

या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुनगंटीवार यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रदूषण कंपन्यांचे धाबे दणाणले असून, आता प्रशासकीय कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

__

error: Content is protected !!