Breaking

Chitra Wagh : हिंमत असेल तर चला उध्दव ठाकरेंकडे, जाब विचारू !

 

Chitra Wagh’s challenge to Anil Parab : चित्रा वाघ यांचे अनिल परबांना आव्हान

Mumbai : विधानपरिषेदमध्ये दिशा सालियन प्रकरणावर मनिषा कायंदे यांनी मुद्दा उपस्थित केला. तेव्हा आमदार चित्रा वाघ यांनी एसआयटी रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी केली. या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात यावा तसेच गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली.

नेमकी हीच गोष्ट विरोधकांना, विशेषतः उबाठा गटाच्या नेत्यांना झोंबली. उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांनी पुजा चव्हाण प्रकरणावर भाष्य करत चित्रा वाघ यांना संजय राठोडांबाबत सवाल केला. यावर आमदार चित्रा वाघ यांनी रणरागिणी होऊन सभागृह दणाणून सोडलं. त्या म्हणाल्या, कोणत्याही स्त्रिला तर्काने उत्तर देता येत नाही, तेव्हा पुरूष तिच्या मर्मावर तिच्या वैयक्तिक गौष्टींवर टीका करुन तिचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतो. हीच प्रचिती आज मंदिरासम सभागृहात आली.

संजय राठोड यांना क्लीनचिट देणारे तात्कालीन मुख्यमंत्री तुमचे उध्दव ठाकरेच होते. मी पूजा चव्हाणला न्याय मिळावा म्हणून जीवाच्या आकांताने लढले. पण तुमच्या उध्दव साहेबांनी संजय राठोडला क्लीनचिट दिली नसती, तर ही वेळ आलीच नसती. हिंमत असेल तर चला आपण उध्दव ठाकरेंना जाब विचारायला जाऊ, असे म्हणत चित्रा वाघ यांनी अनिल परबांना आव्हान दिले.

Chitra Wagh : शाळांसोबतच मैदानांवरदेखील हवे सीसीटीव्ही कॅमेरे !

दिशा सालियन हत्या प्रकरणात दिशाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करताच या प्रकरणाचे पडसाद काल (२० मार्च) विधानपरिषद सभागृहात उमटले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सभागृहात दिशा सालियान प्रकरणाचा पुन्हा सखोल तपास झाला पाहिजे, अशी मागणी केली. यावर आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणात एसआयटीचा रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी केली.

Chitra Wagh : सुरक्षित स्वच्छतागृहे नसल्यास पेट्रोल पंप, हॉटेल मालकांवर होणार कारवाई !

विरोधी पक्षाचे नेते अनिल परब यांनी आदित्य ठाकरे यांना वाचविण्याचा पावित्रा घेत आमदार चित्रा वाघ यांना, पुजा चव्हाण प्रकरणात काय झाले, असे विचारत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावर चित्रा वाघ यांनी उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांची चांगलीच खरटपट्टी काढली. एक वडील आपल्या मुलीसाठी न्याय मागत असताना विरोधक मात्र राजकीय बचाव तंत्रासाठी सभागृहातल्या महिलांचाच अपमान करतात. इतकंच नाही तर सभागृहात २० मार्च रोजी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला असता विरोधकांनी घेतलेली भूमिका महिला विरोधी होती. हे आमदार वाघ यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.