Cidco Land Scam : वनविभागाचे कबुलीपत्र, रोहित पवारांच्या आरोपांना दुजोरा

Demand to register a case against the Biwalkars with whom Shirsat dealt : शिरसाट यांनी व्यवहार केलेल्या बिवलकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या सिडको घोटाळ्याच्या आरोपांना आता सरकारी शिक्कामोर्तब मिळाले आहे. नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळ्यात तब्बल ₹1400 कोटींची जमीन चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित केल्याचे खुद्द वनविभागानेच कबूल केले आहे.

या प्रकरणात संबंधित यशवंत नारायण बिवलकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी वनविभागाने पनवेल आणि उरण पोलिसांना अधिकृत पत्र पाठवले आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

रोहित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकार परिषदेत मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले होते की, “शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना बिवलकर यांना कोट्यवधींची सरकारी जमीन बेकायदेशीरपणे दिली.” त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तब्बल १२ हजार पानांचे पुरावे सादर केले होते. तरीही दोन महिन्यांपासून प्रशासनाने या प्रकरणात कोणतीच कारवाई केलेली नव्हती.

Babanrao Taywade : राजकीय पक्षांनी बोगस ओबीसींना उमेदवारी देऊ नये !

आता वनविभागाच्या अहवालाने या प्रकरणात मोठा धक्का दिला आहे. विभागाने दिलेल्या पत्रानुसार पेन आणि उरण परिक्षेत्रातील आपटा, उलवे, सोनखार, तरघर, दापोली, कोपर आणि पारगाव डुंगी गावांतील सुमारे ६१,७५० चौ.मी. क्षेत्रफळाचे १२ भूखंड चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आले आहेत.

सदर जमीन प्रत्यक्षात वनविभागाची असून, कागदपत्रांमध्ये फेरफार करून ती इतरांच्या नावावर करण्यात आली. उरण परिसरातील या जमिनीचे बाजारमूल्य ₹1400 कोटी, तर रसायनी भागातील जमीन ₹14 कोटी इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Defender car case : एड्सग्रस्तांच्या अनुदानाचा गैरवापर केल्याचा गंभीर दावा

या प्रकरणात बिवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा तत्काळ नोंदवावा, अशी शिफारस वनविभागाने केली आहे. या खुलाशानंतर रोहित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि सरकारवर हल्ला चढवला. “संजय शिरसाट यांनी आता वय पुढं करून पळ काढू नये. सरकारची ५ हजार कोटींची जमीन खाजगी लोकांच्या घशात घालण्यात आली आहे. प्रत्येक इंचाचा हिशोब द्यावाच लागेल, सुट्टी नाही!” असे ट्विट करत त्यांनी शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Dr. suicide case: डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात खळबळजनक आरोप

दरम्यान, संजय शिरसाट यांनी या सर्व आरोपांना फेटाळून लावत म्हटले की, “रोहित पवार बेछूट आरोप करत आहेत. त्यांना आता संजय राऊत यांच्यासारखी वायफळ बोलण्याची सवय लागली आहे.” तसेच, “मी लवकरच निवृत्त होणार आहे,” असा उल्लेख करून त्यांनी या प्रकरणावर अधिक भाष्य करण्यास टाळाटाळ केली.

वनविभागाचे पत्र बाहेर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड हलचल निर्माण झाली आहे. दोन महिन्यांपासूनच्या आरोपांनंतर अखेर सरकारी खात्याने भ्रष्टाचाराची कबुली दिल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई न झाल्यामुळे प्रशासनावर राजकीय दबाव असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

_____