CIDCO land scam : दाढ दुखणं थांबलं असेल तर खाणाऱ्यांनी उत्तर द्यावं

Rohit Pawar’s attack on the Rs 5,000 crore scam ; 5 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांचा हल्लाबोल

Mumbai : नवी मुंबईतील सिडकोच्या तब्बल ५ हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीकडून दखल मिळाली आहे. या समितीने महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या घडामोडीची माहिती देत मंत्री संजय शिरसाट यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी समाज माध्यमावर उच्चाधिकार समितीचे पत्र शेअर करत म्हटलं आहे की, ‘ गॅंग्स ऑफ गद्दार’च्या सिडको जमीन घोटाळ्याच्या महापराक्रमाबाबत १२ हजार पानांचे पुरावे दिल्यानंतरही सरकारला जाग आली नाही. पण सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. वन विभागाची सरकारी जमीन असताना आणि प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही बिवलकर यांना बेकायदेशीर भरपाई दिली, हे कसं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Raut on Bhujbal : तेव्हा तुम्ही शिवसेना सोडली, आता मंत्रिमंडळ सोडणार का?

याच पोस्टमध्ये त्यांनी संजय शिरसाटांवर डिवचणारा टोला लगावत म्हटलं आता दाढ दुखणं थांबलं असेल तर पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचाराचं उत्तर द्याल का? खाणाऱ्यांनी उत्तर द्यावं. काहीही झालं तरी या दलालांना आम्ही सोडणार नाही आणि अजीर्ण होईपर्यंत खाल्लेलं पचवू देणार नाही.

MP Omraje : संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का?

रोहित पवार यांनी यापूर्वीही शिरसाटांवर सिडको अध्यक्ष असताना जमीन घोटाळ्यात सामील असल्याचे आरोप केले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने नोंद घेतल्याने चौकशीला वेग येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घोटाळ्याबाबत राज्य सरकारची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.