Wanted to be an architect, but became a lawyer at my father’s wish : सरन्यायाधीश भूषण गवई यांचा अमरावतीत हृद्य सत्कार
Amravati : “मला वकील व्हायचं नव्हतं, आर्किटेक्ट व्हायचं होतं. पण माझे वडील, दादासाहेब गवई यांची इच्छा होती की मी वकील व्हावं. तीच मी पूर्ण केली. माझ्या आयुष्यात सर्वाधिक प्रभाव त्यांचाच आहे.” अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, डॉ. कमलताई गवई, डॉ. तेजस्विनी गवई, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल किलोर, प्रवीण पाटील, तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा आदींची उपस्थिती होती.
NCP spokesperson : कोट्यवधींचे रस्ते बनवणारे सरकार शेतकऱ्यांना साधे खत देऊ शकत नाही ?
“न्यायदान हे नोकरी नाही, ते सतीचं वाण आहे,” असं म्हणत त्यांनी संविधान सर्वोच्च असल्याचं अधोरेखित केलं. न्यायालयीन निर्णय देताना समाजाच्या गरजांचा विचार करून अनेक निर्णय घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. वकिलांना देखील खूप मेहनत करावी लागते, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.
Somaiya vs Mushrif : सोमय्या यांना धक्का! मुश्रीफांवर केलेले आरोप निघाले बिन बुडाचे
शनिवारी नागपुरात सत्कार
हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा शनिवार, दि. २८ जून रोजी नागपुरात सत्कार आयोजित करण्यात आला आहे. रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता हा सत्कार होईल.