A firm decision by Chief Justice of India Bhushan Gavai : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवईंचा ठाम निर्णय
Amravati : भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, ते न्यायसेवेतील निवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचे सरकारी पद किंवा राजकीय भूमिका स्वीकारणार नाहीत. अमरावती जिल्ह्यातील त्यांच्या मूळगाव दारापुर येथे एका समारंभात ते बोलत होते. गावकऱ्यांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले आणि त्यांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गवई यांनी वडील माजी राज्यपाल रा. जू. गवई यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. तसेच त्यांच्या नावाने उभारल्या जाणाऱ्या स्वागतद्वाराची पायाभरणीही यावेळी केली. त्यांनी दर्यापूर येथे नवीन न्यायालय भवनाचे उद्घाटन केले असून, शनिवारी अमरावती सत्र न्यायालयात एका ई-लायब्ररीचाही उद्घाटन सोहळा होणार आहे.
Mera Khurd Grampanchayat : सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून उभारले गोडाऊन
आपल्या निवृत्तीनंतरच्या योजनांबाबत बोलताना सरन्यायाधीश गवई म्हणाले, सरकारी पद मी स्वीकारणार नाही. निवृत्तीनंतर मला वेळ मिळेल आणि तो मी माझ्या गावात व नागपुरात व्यतीत करीन. या मातीशी माझं नातं घट्ट आहे. गेल्या महिन्यात ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात झालेल्या चर्चेतही गवई यांनी निवृत्त न्यायाधीशांनी राजकारणात प्रवेश किंवा सरकारी पद स्वीकारण्या बाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी यामागची नैतिक कारणे स्पष्ट करताना सांगितले होते की, असे निर्णय न्यायालयीन स्वातंत्र्यावर आणि लोकांच्या विश्वासावर परिणाम करू शकतात.
Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र घेण्याची शक्यता
त्यांनी हेही नमूद केले की, न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर अशा भूमिका स्वीकारल्यास लोकांमध्ये असा समज होऊ शकतो की, न्यायनिर्णय हे भविष्यातील संधी लक्षात घेऊन घेतले गेले. त्यामुळे न्यायपालिकेची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते. गवईंच्या या भूमिकेने पुन्हा न्यायसंस्थेतील नैतिकतेच्या मुद्द्यावर गंभीर चर्चा घडवून आणली आहे. त्यांच्या निवृत्तीपूर्वीच जाहीर केलेल्या या निर्णयाचे अनेक स्तरांवर स्वागत होत आहे.
_____