Breaking

CM Devendra Fadanvis : मुख्यमंत्री म्हणाले, माझ्याकडे पैसेच नाहीत, पाच लाख उधार द्या, FD करतो!

Lend me five lakh rupees, then I will make an FD : राज्य सहकारी बँकेच्या कार्यक्रमात फडणवीसांचे आमदाराला आवाहन

Nagpur नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य सहकारी बँकेची संस्थापक प्रशासक म्हणून नियुक्ती-पदभार स्वीकृतीचा कार्यक्रम नागपुरात झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण संपत असताना आमदार आशीष देशमुख यांनी त्यांना FD करण्याची घोषणा करावी, अशी विनंती केली. त्यावर फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराला सभागृहातून टाळ्या मिळाल्या आणि जोरदार हशाही पिकला.

गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आशीष जयस्वाल, आमदार आशीष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदींची उपस्थिती होती.

Devendra Fadnavis : पुतण्या मुख्यमंत्री, तरीही काकूंवर आली आंदोलनाची वेळ!

मुख्यमंत्र्यांनी भाषण आटोपते घेतले होते. तेवढ्यात आमदार आशीष देशमुख उठले आणि त्यांनी त्यांच्या कानात काहीतरी सांगितले. नेमके काय सांगितले याची उत्सुकता लागलेली असता मुख्यमंत्र्यांनीच त्याचा खुलासा केला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी एफडी जाहीर करावी असे ते म्हणत आहेत. पण माझ्याकडे पैसेच नाहीत. त्यामुळे तुम्ही पाच लाख रुपये मला उधार द्या. मग माझ्या नावाने एफडी करतो.’ त्याचवेळी जेव्हाही एफडी करेन याच बँकेत करेन, असा शब्दही त्यांनी दिला.

Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 पुन्हा दावोसमध्ये

राज्य सहकारी बँकेने संस्थापक प्रशासक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यामुळे आता नागपूर जिल्हा बँकेची समृद्धीच्या दिशेने वाटचाल होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यानच्या काळात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्यामुळे प्रवासात अडचणी आल्या होत्या. पण आता पुन्हा नव्याने सुरुवात होत आहे. आता तर सर्व सरकारी विभागांनी जिल्हा बँकेसोबत NDCC व्यवहार सुरू करावेत, असे निर्देश देणार आहे, असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला.