CM assures investigation against MLA Sanjay Gaikwad in canteen assault controversy : आमदाराच्या अडचणी वाढणार, कॅन्टीनमधील मारहाण शिंदे गटासाठी ठरतेय डोकेदुखी
Mumbai : कॅन्टिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्याला निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्याच्या कारणावरून मारहाण केली होती. हे प्रकरण दोन दिवस खूपच गाजले. मारहाणी चे व्हिडिओ समोर आल्यानंतरही गायकवाड यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे वाद निर्माण झाला. मात्र गायकवाड यांच्यावरील कारवाई बाबत मुख्यमंत्र्यांनी आता भूमिका स्पष्ट केली आहे.
मुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टिन मधील एका कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. हे चुकीचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केल्यानंतर आणि गायकवाडांना समज दिल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केल्यानंतरही गायकवाड आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी तसे वक्तव्यही केले आहे. यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची पोलिसांकडून चौकशी केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे.
Adv. Akash Fundkar : कामगार विभागातील सर्व कार्यालय आता एकाच छताखाली
संजय गायकवाड हे भोजन समितीचे प्रमुख आहेत असे सांगितले जाते. आमदारांची निवास व्यवस्था असलेल्या आकाशवाणी गेस्ट हाउस मधील कॅन्टीन मध्ये शिळे अन्न खायला दिले असा आरोप करत एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्याचे व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलेच व्हायरल झाले. एका लोकप्रतिनिधीने अशा पद्धतीने कर्मचाऱ्यावर हात उचलणे कितपत योग्य आहे? असा सवाल निर्माण झाला. सत्ताधारी आमदारांची मग्रुरी यावर विरोधकांनी मोठी ठिकाणी केली. या प्रकारात त्या कॅन्टीनचा परवाना तडकाफडकी रद्द करण्यात आला.
Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती’ की ‘शोषण शक्ती’?
गायकवाड यांच्या या कृत्यावर कारवाई व्हावी अशी मागणी विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर झाली. पण कोणीही तक्रारदार नसल्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. असे सांगण्यात आले, घटना घडल्यानंतर पोलिसांनी कॅन्टीनमध्ये येऊन संबंधित प्रकाराबद्दल चौकशी केली होती. पण गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, हे पाहून विरोधक आक्रमक झाले. त्यांच्यावर टीका होत होती, यावर आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली, कोणत्याही तक्रारीची आवश्यकता नाही गायकवाड यांची नियमानुसार चौकशी होईल असे स्पष्ट केले आहे.