Breaking

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना प्रेक्षक ओरडत होते?

Nitin Gadkari was thanked by lighting a mobile Flash Light : खासदार क्रीडा महोत्सवात नागपूरकरांचे अनोखे रुप; फडणविसांनाही हसू आवरले नाही

Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचे KKM आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचा समारोप रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. धंतोलीतील यशवंत स्टेडियमवर झालेल्या या कार्यक्रमात नागपूरकरांचे अनोखे रुप बघायला मिळाले. कारण एकीकडे मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होते आणि प्रेक्षक ओरडत होते. लोक का ओरडताहेत हे मुख्यमंत्र्यांना माहिती असल्यामुळे त्यांनाही हसू आवरले नाही.

देवेंद्र फडणवीस यांचे भाषण संपूर्ण स्टेडियम शांतपणे ऐकत होते. कारण या भाषणानंतर ‘सनम बँड’ कॉन्सर्ट होती. पण, भाषणाचा शेवट करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एक वाक्य म्हटले आणि गोंगाट सुरू झाला. ते म्हणाले, ‘मला माहिती आहे, तुम्ही इथे मला ऐकायला आलेले नाही. त्यामुळे मी आता माझं भाषण थांबवतो आहे,’ एवढी दोन वाक्य ऐकताच स्टेडियममध्ये गोंगाट सुरू झाला. कुणी टाळ्या वाजवत होते. कुणी ‘सनम’… ‘सनम’… ची नारेबाजी करत होते. एकवेळ अशी आली की स्वतः मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरले नाही आणि त्यांनी भाषण आटोपते घेतले. एवढेच नव्हे तर पुढचा एक तास गाणीदेखील ऐकली.

Dr. Prakash Amte : डॉ. आमटेंनी मांडले आदिवासी भागातील वास्तव

फ्लॅश लाईट लावून गडकरींचे आभार
मुख्यमंत्र्यांनी भाषणा शेवट मात्र अनोख्या पद्धतीने केला. प्रेक्षक सनम बँडला ऐकण्यासाठी आतूर झालेले आहेत, हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी भाषण आटोपते घेतले. पण शेवट करताना संपूर्ण स्टेडियम मोबाईल टॉर्चच्या उजेडाने उजळले होते. ‘नितीनजींनी या महोत्सवाचं आयोजन केल्यामुळे हजारो खेळाडूंना संधी मिळाली. त्यामुळे आपण सर्वांनी मोबाईल टॉर्च लावून नितीनजींचे आभार मानले पाहिजे,’ असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यांच्या आवाहनानंतर हजारोंच्या गर्दीने फ्लॅश लाईट सुरू केला आणि स्टेडियम उजळून गेले होते.