War Room for the supervision of Mayo – Medical
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अधिकाऱ्यांना निर्देश; जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवस्था
Nagpur इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) विकासकामांच्या संथगतीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. मेयो व मेडिकलमधील प्रगतिपथावरील कामे, सद्यस्थिती, अडी-अडचणी, कामाची गुणवत्ता यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मेयो व मेडिकलला शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विकास कामाचा आढावा घेतला. यावेळी आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार आशीष देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, डॉ. राज गजभिये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Local body elections : अकोल्यासह ६ जिल्हा परिषदांमध्ये येणार प्रशासक राज ?
मेयो व मेडिकलमध्ये गरीब रुग्ण मोठ्या प्रमाणावर येतात व रुग्णांचा या इस्पितळांवर विश्वास आहे. येथील वैद्यकीय सेवा सुविधा वाढाव्यात व अधिकाधिक गरजू रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये निधी येथील कामांना उपलब्ध करून दिला आहे. ही कामे दिलेल्या कालमर्यादेत व आराखड्यानुसार पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मेडिकल आणि मेयोमधील सध्याची प्रस्तावित कामे पूर्ण करावी. त्यानंतरच नवीन कामे सुरू करावीत. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या दोन्ही रुग्णालयांना लागणाऱ्या वीजेची गरज ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून भागविली पाहिजे. संपूर्ण कॅम्पस परिसर हा सौर ऊर्जेवर असावा , यावर भर देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
CM DEVENDRA FADNAVIS : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मेडिकलचे वसतिगृह पडद्यात लपविले !
जुनी कामे पूर्ण केल्यावरच नवीन
मेडिकल आणि मेयोमधील सध्याची प्रस्तावित कामे पूर्ण करावी. त्यानंतरच नवीन कामे सुरू करावीत. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मेडिकल व मेयोमध्ये अधिकाधिक झाडे लावण्यावर भर देण्यात यावा, असेही ते पुढे म्हणाले. मेडिकल व मेयोमध्ये उभारण्यात येणा-या सर्व इमारतींच्या प्रसाधनगृहांची देखभाल ही योग्य प्रकारे व्हावी, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आढावा
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील सुरू असलेली कामे दिशानिर्देशानंतर किती पूर्ण झाली. याचा आढावा एप्रिल महिन्यात पुन्हा घेण्यात येणार आहे. यावेळी कामाच्या सद्यस्थितीची माहिती प्राधान्याने घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.