Co-operative sector : अवसायनातील ३६ संस्थांची नोंदणी रद्द होणार!

Registration of 36 non-operational institutions set to be cancelled : सहकारी संस्थांबाबत जाहीर सूचना; दावे सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत

Buldhana बुलढाणा तालुक्यातील दीर्घकाळापासून अवसायनात असलेल्या विविध सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याची वैधानिक प्रक्रिया सहकार विभागामार्फत अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये ही कार्यवाही सुरू असून, संबंधित संस्थांचे व्यवहार अधिकृतरीत्या बंद करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम ८९ (४) नुसार, अवसायनात असलेल्या सहकारी संस्थांविरुद्ध ज्या कोणाच्या काही देणी, दावे अथवा हक्क असतील, त्यांनी जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत लेखी स्वरूपात आवश्यक पुराव्यासह संबंधित नोंदणी कार्यालयात आपले दावे सादर करणे बंधनकारक आहे.
सहकार विभागाने स्पष्ट केले आहे की, विहित मुदतीत कोणताही दावा किंवा लेखी खुलासा प्राप्त न झाल्यास, त्यानंतर सादर होणाऱ्या दाव्यांची दखल घेतली जाणार नाही. तसेच उशिरा दाखल होणाऱ्या दाव्यांची जबाबदारी सहकार विभाग किंवा नियुक्त अवसायकावर राहणार नाही.

Sanjay Raut : मुंबईचे दुश्मन मुघल वृत्तीचे, संजय राऊतांची टीका

 

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ अन्वये या सर्व संस्थांना अंतिम अवसायनात घेण्यात आले आहे. संबंधित संस्थांवर अवसायकाची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली असून, संस्थांची मालमत्ता, देणी-घेणी तसेच कागदपत्रांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित वैधानिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी रद्द करण्याची अंतिम कार्यवाही करण्यात येणार आहे.