Residential addresses of 90% of voters missing in Amravati : प्रारूप यादीवर ८७१ नागरिकांचे आक्षेप, मतदान चोरीची भीती व्यक्त
Amravati महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्याचा आरोप करत ८७१ नागरिकांनी अधिकृतरीत्या आक्षेप नोंदवले आहेत. “सुमारे १.४० लाख मतदारांच्या नोंदींमध्ये गोंधळ असून प्रारूप यादीतील ९० टक्के मतदारांच्या निवासाचा पत्ताच नमूद नाही. त्यामुळे मतदान चोरीचा मोठा धोका आहे,” असा गंभीर आरोप मुन्ना राठोड व समीर जवंजाळ यांनी श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू करताना प्रथम प्रभागनिहाय सीमांकन जाहीर केले, त्यानंतर २२ प्रभागांचे आरक्षण व लोकसंख्या घोषित केली. मात्र, १९ नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा मतदार यादीनुसार तयार केलेल्या प्रारूप यादीत प्रभागवार मोठे विसंगत बदल आढळले आहेत.
Winter session : विरोधकांच्या टीकेला फडणवीसांकडून जशास तसे उत्तर
तक्रारदारांच्या मते, काही प्रभागांमध्ये ३,००० ते १०,००० मतदारांची नावे अतिरिक्त समाविष्ट करण्यात आली. तर काही प्रभागांमध्ये २,००० ते ४,००० नावे वगळली गेली. तसेच याबाबत एकूण ८७३ नागरिकांनी आक्षेप नोंदवले आहेत.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, प्रभाग क्रमांक आणि अनुक्रमांकांच्या पुढे मतदारांचा निवासी पत्ताच नमूद नसल्याने, संबंधित मतदार त्या प्रभागातील आहे की नाही हे सिद्ध करणे अशक्य बनत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, “सुमारे १.४० लाख वाढीव मतदार आणि अपूर्ण नोंदींमुळे अधिकृत यादी निघाल्यानंतरही गोंधळ कायम राहू शकतो. यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीत बी.एल.ओ.कडे वेगळी, उमेदवारांकडे वेगळी आणि मतदान केंद्रावर वेगळी अशी तीन वेगवेगळ्या यादी असल्याने नागरिकांना मतदानापासून वंचित रहावे लागले. तसाच प्रकार पुन्हा होण्याची शक्यता आहे.”
Sudhir Mungantiwar : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘प्रतिहेक्टरी वीस हजार बोनस’ जाहीर करा !
अंतिम मतदार यादी जाहीर करताना आक्षेप नोंदवलेल्या नागरिकांना दुसरी संधी देऊन काही दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. तसेच केंद्र व राज्य निवडणूक आयोगाला ‘मतदान चोरी’बाबत प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात आले. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक मुन्ना राठोड व समीर जवंजाळ उपस्थित होते.








