Congress Agitation against the Election Commission : कॉंग्रेसचा संविधानावर विश्वास नाही का?

Does the Congress not believe in the Constitution? : निवडणूक आयोगाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Nagpur प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला संविधान प्रणालीत महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या निवडणूक आयोगावरच कॉंग्रेसने अविश्वास दाखविला. आणि चक्क आयोगाविरोधात आंदोलन केले. मतदार दिनानिमित्त काँग्रेसने शनिवारी निवडणूक आयोगाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आयोगाने मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात, माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन झाले. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग या संस्थेची स्थापना केली आहे.

NANA PATOLE : भाजपचे लोक आमच्याकडे तिकीट मागण्यासाठी आले होते

राज्यघटनेने निवडणूक आयोगाला देशातील संपूर्ण निवडणुकांचे निर्देश आणि नियंत्रण करण्याचे अधिकार दिले आहेत. निवडणुकीत मतदार हा राजा असतो. परंतु, मागील काही वर्षांतील निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपाती दिसत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वनीय व काहीतरी गडबड असल्याचे जाणवते. राज्यातील राजकीय परिस्थिती सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती.

सहा महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते. मात्र, त्यानंतर मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला. याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले. त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला, असा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी यावेळी केला. मतदारांचाही विधानसभेच्या निकालावर विश्वास बसलेला नाही. आपले मतदान चोरले गेल्याची भावना जनतेत आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून आम्ही निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दाफाश करत आहोत, असे डॉ. नितीन राऊत म्हणाले.

Congress On NDA Government : निवडणूक आयोग आणि सरकारची छुपी युती

आंदोलनात माजी आमदार अशोक धवड, व्यापारी सेलप्रमुख व सरचिटणीस अतुल कोटेचा, गिरीश पांडव, कमलेश समर्थ, प्रशांत धवड, प्रा. दिनेश बानाबाकोडे, बंडोपंत टेेभुुर्णे, वसीम खान, मिलिंद दुपारे, संदेश सिंगलकर, विवेक निकोसे, राजेश कुंभलकर, ज्ञानेश्वर ठाकरे, राजेश पौनीकर, पृथ्वी मोटघरे, प्रवीण गवरे, पंकज थोरात, पंकज निघोट, देवेंद्र रोटेले, प्रमोदसिंग ठाकूर, मोतीराम मोहाडीकर, किशोर गिद, युगल विदावत आदींनी भाग घेतला.