व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Congress On NDA Government : निवडणूक आयोग आणि सरकारची छुपी युती

Congress On NDA Government : निवडणूक आयोग आणि सरकारची छुपी युती

A secret alliance between Election Commission and Govt : काँग्रेसचा आरोप; देशातील लोकशाही धोक्यात

Amravati निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारची छुपी युती आहे. त्यामुळे देशातील लोकशाही व्यवस्था धोक्यात आली आहे, असा गंभीर आरोप माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर Yashomati Thakur आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही वाचविण्याची जबाबदारी सुजान नागरिकांवर असल्याचे सांगत काँग्रेस पक्ष शेवटच्या श्वासापर्यंत लोकशाहीसाठी लढा देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. ठाकूर बोलत होत्या. यावेळी खासदार बळवंत वानखडे आणि इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Guardian minister Babasaheb Patil : जिल्ह्याचा विकास निधी ठरलेल्या वेळेत खर्च करा !

अॅड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, “लोकसभा निवडणुकीची मतदारयादी आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदारयादीत मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आली आहे. मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या आकडेवारीत झालेला मोठा फरक हा लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा आहे.” त्याचबरोबर त्रिशूळच्या नावावर शस्त्रांचे वाटप होत असल्याचे उदाहरण देत निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी केला.

केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर तीव्र टीका करत जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख म्हणाले, “सामान्य नागरिकांच्या भावनांची पायमल्ली करून हे सरकार सत्तेवर आले आहे. मात्र, या दडपशाहीविरोधात काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून एल्गार पुकारेल.” पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लोकशाही बचावाच्या भूमिकेवर ठाम राहून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

Babasaheb Patil : सहकार क्षेत्राला मिळणार ‘मॉडर्न टच’ !

या कार्यक्रमात माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे, हरिभाऊ मोहोड, बाळासाहेब हिंगणीकर, जयंत देशमुख, भय्या पवार, सुधाकर भारसाकळे, प्रदीप देशमुख, पंकज मोरे, वैभव देशमुख यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!