Congress : जीएसटी कपात ही निवडणुकीपूर्वीची दिखाऊ योजना

The GST cut is a showy scheme before the elections : शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याचा काँग्रेस नेत्याचा आरोप

Motala केंद्र सरकारने खतं, ट्रॅक्टर व शेतीसंबंधित उपकरणांवरील जीएसटी दरात मोठी कपात जाहीर केली असली तरी हा निर्णय शेतकऱ्यांसाठी उशिरा दाखवलेली काळजी असून निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी रचलेली डावपेचाची योजना आहे, अशी टीका काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रविण आप्पा कदम यांनी केली.

सरकारच्या घोषणेनुसार —
ट्रॅक्टर टायर व पार्ट्स : १९% वरून ५%,
ट्रॅक्टर : १२% वरून ५%
बायो-पेस्टिसाइड्स व मायक्रो-न्यूट्रिएंट्स : १२% वरून ५%
ठिबक सिंचन व स्प्रिंकलर : १२% वरून ५%
जमीन तयार करणे, लागवड, कापणी व मळणीसाठी लागणाऱ्या यंत्रणा : १२% वरून ५%
हे दर कमी करण्यात आले आहेत.

Mehkar Panchayat Samiti : सुनावणीसाठी एकाच दिवशी ९० अधिकारी–कर्मचारी अमरावतीत

“शेतकऱ्यांची दिशाभूल”

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना कदम म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांवर १२% ते १८% जीएसटीचा अन्याय केला गेला. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच दरांना ५% करून सरकार कृपादृष्टी दाखवत असल्याचा डंका पिटत आहे. प्रत्यक्षात ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी योजना आहे.

खर्च वाढतोय, सबसिडी थांबतेय

खतं, बियाणे, कीडनाशके, वीज व डिझेल यांचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. उत्पादन खर्च झपाट्याने वाढत असताना सबसिडी वेळेवर मिळत नाही. महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत केवळ जीएसटी कपात करून शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळणार नाही, असे कदम यांनी स्पष्ट केले.

Maratha Reservation : लोणारमध्ये ओबीसी समाजाकडून जीआरची होळी!

“जीएसटी रद्द करा”

कदम पुढे म्हणाले की, जर केंद्र सरकारला शेतकऱ्यांबद्दल खरी सहानुभूती असेल तर शेतीसाठी लागणाऱ्या सर्व घटकांवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करायला हवा. निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही घोषणा ही फक्त मतांसाठीचा दिखावा असून शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांकडे दुर्लक्षच केलं जात आहे.