व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Congress Vs BJP : पंतप्रधानांच्या आईवरील ए आय व्हिडिओवरून वाद

Congress Vs BJP : पंतप्रधानांच्या आईवरील ए आय व्हिडिओवरून वाद

BJP is angry, where is the disrespect in saying Congress : भाजप संतप्त, काँग्रेस म्हणे अनादर कुठे?

New Delhi : काँग्रेसने सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा एक एआय-निर्मित व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वादळ उठले आहे. भाजपने या व्हिडिओवरून काँग्रेसवर तीव्र टीका करत संताप व्यक्त केला असून काँग्रेसने मात्र कुठलाही अपमान झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, “जनतेकडून वारंवार नाकारले गेलेले काँग्रेस आता हताश झाली असून विकृततेचा नवीन रेकॉर्ड करण्याचा निर्धार केला आहे.” भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी थेट राहुल गांधींवर निशाणा साधत आरोप केला की, “काँग्रेसकडून मोदींच्या आईचा अपमान हा राहुल गांधींच्या सांगण्यावरून होत आहे.”

Local Body Elections : निवडणूक आचारसंहितेची धाकधूक, पालकमंत्र्यांची लगीनघाई!

भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आरोप फेटाळले. ते म्हणाले – “आई-वडिलांचे कर्तव्य असते आपल्या मुलांना शिक्षित करणे. त्या फक्त आपल्या मुलाला शिक्षित करत आहेत. यात अपमान कुठे आहे ते दाखवा. जर पंतप्रधानांना हा अपमान वाटत असेल, तर ती त्यांची समस्या आहे, आमची नाही.”

Vidarbha Farmers : रस्त्याचे काम दोन वर्षांपासून ठप्प, शेतकऱ्यांचे उपोषण

काही दिवसांपूर्वी काँग्रेस-राजदच्या बिहारमधील एका रॅलीत पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्द वापरण्यात आले होते. त्यावेळी मोदींच्या आईचाही उल्लेख झाला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते – “हा अपमान केवळ माझा नाही, तर देशातील प्रत्येक आई, बहीण आणि मुलीचा आहे. बिहारच्या जनतेलाही हे दुःख आहे.”

डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन मोदी यांचे ९९ व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे काँग्रेसच्या या व्हिडिओवरून भाजपने संताप व्यक्त केला असून हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

____

error: Content is protected !!