Congress’s agitation : गडचिरोली वैनगंगा नदी पात्रात काँग्रेसचे आंदोलन !

 

Congress leader Vijay Wadettiwar and his workers entered the Wainganga riverbed : विजय वडेट्टीवार यांच्यासह कार्यकर्ते उतरले वैनगंगा नदी पात्रात

Gadchiroli : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेला गडचिरोली हा जिल्हा अतिदुर्गम व मागास आहे. जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. गोसेखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावली आहे. शेतकऱ्यांना शेती करायला अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी सोडण्यासाठी काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात आंदोलन करण्यात आले.

नदी काठच्या गावांतील भूजल पातळीसुद्धा कमी झाली आहे. अनेक गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन गोसीखुर्द धरणातील पाणी तातडीने सोडण्यात यावे, या मागणीसाठी आज (५ एप्रिल) काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि वैनगंगा नदीपात्रात एकत्र येत आंदोलन पुकारले.

Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच जवळचे लोक टार्गेट करत आहेत !

 

गडचिरोली येथे होणाऱ्या विमानतळाकरीता सुपीक जमिन अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परीसरातील MIDC करिता प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र स्थापना करण्याकरिता शासनाने अवलंबिलेले धोरण शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय जागा अधिग्रहीत करू नये, या मागणी आंदोलनात करण्यात आल्या.

Vijay Wadettiwar : अजित पवारांना निर्भया फंडचा विसर पडला !

कोटगल बॅरेज करिता अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेत जमिनीचा मोबदला संबधित शेतकऱ्यांना मिळालेला नाही. योग्य तो मोबदला त्वरित देण्यात यावा. जी शेती बारमाही पाण्याखाली बुडीत क्षेत्रात येते, अशा शेतकऱ्यांना अतिरिक्त मोबदला देण्यात यावा. मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे थकीत असलेले मजुरीचे पैसे त्वरित देण्यात यावे. वडसा – गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमीनधारक सर्व शेतकऱ्यांना नवीन दरानुसार जमिनीचा मोबदला देण्यात यावा, यासुद्धा मागण्या आंदोलकांनी केल्या.