Ajit Pawar got angry on the issue of loan waiver : कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले
Dhara#shiv : अतिवृष्टीमुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती खरडून गेली असून बळीराजाचे दिवाळीपूर्वीच दिवाळं निघालं आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ पूरग्रस्त भागात पाहणी दौऱ्यावर आहेत. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
परंडा येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना एका तरुणाने कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला. त्यावर अजितदादांचा पारा चढला. त्यांनी थेट म्हटलं, “याला द्या रे मुख्यमंत्रीपद, सगळी सोंगं करता येतात, पैशांचं सोंग करता येत नाही. आम्ही इथे गोट्या खेळायला आलो आहोत का?” असे म्हणत त्या युवकाला झापलं. याचबरोबर त्यांनी, “मी सकाळपासून दौऱ्यावर आहे. काम करणाऱ्यांनाच समजतं,” असंही म्हटलं. त्याचवेळी त्यांनी लाडक्या बहिणींना 45 हजार कोटींचा दिलेला निधी आठवून दिला.
DPC Meeting : डीपीसी बैठक पुन्हा पुढे ढकलली, आता २६ सप्टेंबरला सत्ताधाऱ्यांची परीक्षा
आज सकाळी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांनी महिलांना सल्ला दिला. “तुमच्या मुलं मोबाईलवर काय करतात याकडे लक्ष द्या. एका महिलेच्या खात्यातील सरकारी योजनेचा पैसा तिच्या मुलाने गेम खेळण्यात उधळला,” असे उदाहरण देत त्यांनी पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
अजितदादांच्या या वक्तव्यांवर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्याऐवजी अजित पवार असंवेदनशीलतेने वागत आहेत. पाहणी दौरे हे केवळ दिखावा आहेत. सरकारने तातडीने ठोस मदत जाहीर करावी,” अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे लाखो शेतकरी हवालदिल झाले असून राज्य सरकारच्या मदतीच्या घोषणांवरून राजकीय वाद अधिकच तीव्र झाला आहे.