controversy : कबूतरांसाठी धर्मसभा; जैन मुनींच्या वक्तव्यावर राजकीय वाद !

Party announcement anger of Avinash Abhyankar and Manisha Kayande : पक्षाची घोषणा, अविनाश अभ्यंकर आणि मनीषा कायंदेंचा संताप

Mumbai : मुंबईत कबूतरखान्याच्या प्रश्नावरून पेटलेल्या वादाला आज धर्मिय आणि राजकीय रंग मिळाला. कबूतरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्मशांतीसाठी जैन समाजाकडून धर्मसभा आयोजित करण्यात आली. या धर्मसभेनंतर जैन मुनींनी पत्रकार परिषद घेऊन नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. “आम्ही महापालिकेत आमचे उमेदवार उभे करू, शिवसेनेत वाघ होता, आम्हाला कबुतरांची पार्टी पाहिजे,” असं म्हणत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी जन कल्याण पार्टीची घोषणा केली.

निलेश मुनी म्हणाले, “जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो. आता आमचीही संघटना असणार आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून जनकल्याणासाठी काम करू.” त्यांनी स्पष्ट केलं की, “ही फक्त जैनांची पार्टी नाही, ही गुजराती आणि मारवाडी समाजाचीही पार्टी आहे. आमच्या पक्षात ‘चादर-फादर’ सोडून सर्वांना प्रवेश असेल.”

Jain Dharma Sabha : जन कल्याण पार्टीची स्थापना, पक्षचिन्ह कबूतर

धर्मसभेत जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने मात्र नवा वाद निर्माण केला. “मी डॉक्टरांना मूर्ख मानतो. एक-दोन जण मेल्यानं काय होतं? दररोज सामान्य माणूस मरतो, त्याचा सरकार विचार करत नाही,” असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मनसे नेते अविनाश अभ्यंकर म्हणाले, “टॅक्स भरतो म्हणून मुंबईवर हक्क सांगणार का? महाराष्ट्राचा मराठी माणूस इमानाने काम करतो. तो कुणालाही फसवत नाही, बँक बुडवून परदेशात पळत नाही. मराठी माणसाने सहिष्णूपणे सगळ्यांना जागा दिली, आणि आता तेच मुंबईवर हक्क सांगत आहेत. हे अयोग्य आहे.”

Weather update : मान्सून राज्यातून परतला; आता ऑक्टोबर हीटचा तडाखा !

जैन मुनींच्या “एक-दोन जण मेल्यानं काय होतं” या विधानावर त्यांनी संताप व्यक्त करत म्हटलं, “जे स्वतःला अहिंसावादी म्हणवतात, त्यांना एखादा माणूस मेल्याने फरक पडत नसेल, तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. जर खरोखर अहिंसेचा उपदेश करायचा असेल, तर आधी मंदिरातील जाळ्या काढून दाखवा. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ मूर्ख नाहीत.”

शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनीही या वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल केला. “मानवी जीवाशी संबंधित विषयाची त्यांनी खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर द्यायला हवं. त्यांच्या घरातील कुणी फुफ्फुसाच्या आजाराने किंवा कबूतरांमुळे मृत्युमुखी पडले असेल, तर ते असं वक्तव्य करू शकले असते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Local body election : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचालींना वेग !

त्या पुढे म्हणाल्या, “आज मराठवाड्यात जनावरे मरत आहेत, रेबीजसारखे आजार पसरत आहेत. कुठल्या जैनांच्या घरात कबूतराचा फोटो आहे का? त्याची पूजा केली जाते का? तो एक पक्षी आहे. घरात उंदीर आला तर गणपतीचे वाहन म्हणून त्याला नमस्कार करायचा का? असे अनेक प्राणी आहेत जे माणसाला हानी पोहोचवतात,” असं म्हणत कायंदेंनी संताप व्यक्त केला.

कबूतरखान्यावरून सुरू झालेला हा वाद आता धार्मिक आणि राजकीय पातळीवर पोहोचला असून, जैन मुनींच्या नव्या जन कल्याण पार्टीच्या घोषणेमुळे मुंबईच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

_____