Crime in Gondia : महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळला

The partially burnt body of the woman was found : देऊटोला बबई कालव्याजवळ झाली गर्दी

Gondia तालुक्यातील देऊटोला-बबई गावालगत असलेल्या कालव्याजवळ शेतशिवारात अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना आज सकाळी (दि.१०) सकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार सोमवारी सकाळी ६ वाजताच्या काही गावकऱ्यांना कालव्याजवळ महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला. यानंतर गावकऱ्यांनी याची माहीती लगेच गोरेगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले.

Justice Bhushan Gawai : दुर्गम भागात न्याय पोहोचविण्याचे उद्दिष्ट

ही महिला ३० ते ३५ वर्ष वयोगटातील आहे. घटना नेमकी कशी घडली. याविषयी माहिती मिळू शकली नाही. महिलेच्या शेजारी दुसऱ्या बांधीत तणसाचे ढीग जळालेले आहे. या महिलेची ओळख पटलेली नाही. महिलेला नेमके कोणी कसे आणि का जाळले हे तपासानंतरच पुढे येणार आहे.

गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ही घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळी आढळलेल्या स्थितीवरुन हा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : अमरावतीत शिवसेना ठाकरे गटात भूकंप

महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान
सदर महिलेचा चेहरा व वरील भाग पुर्णपणे जळालेला आहे. त्यामुळे या महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे.