Breaking

Crime in Gondia : अविवाहित गर्भवतीचा गळा आवळून खून!

Unmarried pregnant woman strangled to death : प्रेमप्रकरणातून घडली घटना; पिच्छा सोडविण्यासाठी उचलले पाऊल

Gondia विटभट्टीवर कामावर असताना सूत जुळून आले. त्यात तरूणी गर्भवती झाली. तिच्यापासून पिच्छा सोडविण्यासाठी तरूणाने तिचा गळा आवळून खून केला. एवढेच नव्हे तर ओळख पटू नये यासाठी तिला अर्धवट जाळले. गोरेगाव तालुक्यातील देऊटोला-बबई गावालगत असलेल्या कालव्याजवळ घडलेली ही घटना सोमवारी (दि. १०) सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पौर्णिमा विनोद नागवंशी (१८, रा. मानेकसा) असे मृत तरूणीचे नाव आहे.

सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास काही गावकऱ्यांना कालव्याजवळ महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला. गावकऱ्यांनी याची माहिती गोरेगाव पोलिसांना दिली असता पोलिस निरीक्षक अजय भुसारी यांनी ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. तर पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनीही घटनास्थळाला भेट दिली.

Rajendra Shingne, Shashikant Khedkar : विधानसभेत पराभूत उमेदवार मैदानात एकत्र!

गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी शकील मुस्तफा सिद्दीकी (३८, रा. मामा चौक, गोविंदपुर रोड, गोंदिया) याने तिचा खून केल्याचे उघडकीस आणून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कलम १०३,(१), २३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीने मृत तरूणीचा गळा आवळून खून केला त्यानंतर तिची ओळख पटू नये यासाठी तिला जाळण्यात आल्याची कबूली दिली. तिच्या अंगावर चादर व तनस टाकून जाळून पुरावा नष्ट करण्याचे उद्देश्यातून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुलीला त्याने गरोदर केल्याने ती मुलगी आता पती-पत्नी म्हणून एकत्र राहू म्हणायला लागली. त्यामुळे तिच्यापासून आपली सुटका करून घेण्याकरिता तिला जिवे मारले. आरोपीला गोरेगाव पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Local Body Elections : राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आउटगोइंग वाढले

पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, पोलिस निरीक्षक भुसारी, सहायक पोलिस निरीक्षक धीरज राजूरकर, महिला पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, हवालदार राजू मिश्रा, नेवालाल भेलावे आदींनी ही कारवाई केली