Breaking

Crime in Khamgao : शेगावात मुख्याध्यापिकेला लाच घेताना रंगेहाथ पकडले!

Headmistress caught red-handed while taking a bribe by ACB : देयके मंजूर करण्यासाठी दोन लाखांची मागणी

Khamgao पिढी संस्कारित करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. म्हणूनच या शिक्षकांना भारतीय संस्कृतित गुरूचा दर्जा आहे. पण आधुनिक काळात गुरूच मूल्यांची ऐशीतैशी होताना दिसत आहे. शेगावात असाच एक प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एका मुख्याध्यापिकेला दोन लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने ACB रंगेहाथ पकडले आहे.

अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत १२ महिन्यांची देयके रखडलेली आहेत. ही देयके मंजूर करण्यासाठी प्रभारी मुख्याध्यापिका सीमा वनकर (वय ५४) यांनी तब्बल दाेन लाख रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACB या मुख्याध्यापिकेला लाचेच्या रकमेतील ६० हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना रंगेहाथ अटक केली.

अनुसुचीत जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत भोजन व दूधपुरवठा करणारे ठेकेदाराचे ऑगस्ट २०२४ पर्यंतची बिले मंजूर झाली आहेत. तरीही सप्टेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या पाच महिन्यांची तसेच डिसेंबर २०२३ पासून सुरू असलेल्या दूधपुरवठ्याची एकूण १२ महिन्यांची बिले रखडलेली आहेत. ही बिले मंजूर करण्यासाठी २.१० लाख रुपयांच्या लाचेची मागणी प्रभारी मुख्याध्यापिकेने केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

१० फेब्रुवारी रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार, भोजन बिलाच्या प्रत्येक महिन्यासाठी ३० हजार रुपये (एकूण १.५ लाख) आणि दूधपुरवठ्याचे दरमहा ५ हजार रुपये (एकूण ६० हजार रुपये) लाच मागण्यात आली. त्यातील पहिला हप्ता म्हणून ६० हजार रुपये स्वीकारताना सीमा वनकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

भोजन व्यवस्थेबाबत कोणतीही तक्रार न करता ठेकेदाराचे देयक मंजूर करणे. विद्यार्थिनींचा दैनंदिन उपस्थिती अहवाल तयार करणे. तसेच दरमहा सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय बुलढाणा येथे अहवाल सादर करणे. या मोबदल्यात प्रभारी मुख्याध्यापिका सीमा वनकर यांनी लाचेची मागणी केली होती.