House in England, farmhouse put up for sale, luxurious bungalow purchased : इंग्लंडमधील घर, फार्महाऊस विकायला लावलं, आलीशान बंगला खरेदी
Pune : श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली पुन्हा धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका नामांकित आयटी इंजिनिअर आणि त्यांच्या शिक्षक पत्नीस भोंदू बाबाच्या सापळ्यात अडकून तब्बल १४ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. या भोंदू बाबाने “शंकर महाराज” अंगात येतात आणि दुर्धर आजार बरे करतील असा दावा करत इंग्लंडमधील घर, फार्महाऊस आणि पुण्यातील मालमत्ता विकायला लावल्या.
या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव दीपक खडके असून, त्याला त्याची शिष्या वेदिका पंढरपुरकर हिने फसवणुकीत मदत केली आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crop Insurance Issue : केंद्रीय कृषिमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
पीडित आयटी इंजिनिअर दीपक डोळस आणि त्यांची पत्नी, ज्या शिक्षक आहेत, यांना त्यांच्या दोन लहान मुलींच्या आजारपणावर उपचार मिळावेत म्हणून खडके आणि पंढरपुरकर यांच्या संपर्कात आणण्यात आलं. वेदिका पंढरपुरकर ही “माझ्या अंगात शंकर महाराज येतात” असा दावा करत असे. त्यानंतर तीने सांगितलेले सर्व आदेश पाळण्यास दांपत्यास भाग पाडण्यात आलं.
डोळस दांपत्याने आपल्या मुलींच्या आरोग्यासाठी सर्व काही गमावलं बँकेतल्या ठेवी, सोनं, मालमत्ता आणि अगदी इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस देखील. या सर्व व्यवहारांमध्ये पैसे आरटीजीएसद्वारे थेट दीपक खडके आणि वेदिका पंढरपुरकर यांच्या खात्यांवर वळते करण्यात आले.
Election Commission : कोणताही बदल न करता आरक्षणाची यादी केली अंतिम
ही फसवणूक 2018 पासून सुरु होती. डोळस दांपत्याला सुरुवातीला आश्वासन देण्यात आलं की, संपत्ती विकल्याने त्यांच्या मुलींच्या आरोग्यात सुधारणा होईल. पण मुलींची तब्येत बिघडतच गेल्याने त्यांनी विचारणा केली असता, “तुमच्या घरात दोष आहे” असा बहाणा करण्यात आला.
डोळस कुटुंब इंग्लंडमध्ये काही काळ नोकरी करत असल्याने तिथे त्यांचं घर आणि फार्महाऊस होतं. पंढरपुरकर आणि खडके यांनी तेही विकायला लावून पैसे आपल्या खात्यात वळवले. त्यानंतर पुण्यातील प्लॉट आणि फ्लॅट विकून त्याचे पैसेही हडप करण्यात आले.
Amit Baghel controversy : भाजपच्या नेत्यांची छत्तीसगड सरकारकडे तक्रार!
डोळस दांपत्याने अखेर राहण्यासाठी एकच घर शिल्लक ठेवलं. मात्र आरोपींनी ते घर तारण ठेवून लोन काढायला लावलं, शिवाय पर्सनल लोनही घेण्यास भाग पाडलं. सर्व पैसे खडके आणि पंढरपुरकर यांनी स्वतःच्या नावावर वळवले. नंतर या पैशांतून त्यांनी कोथरुडमधील महात्मा सोसायटीत “आकाशदीप” नावाचा आलीशान बंगला खरेदी केला असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.
High Court decision : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचा मोठा निर्णय;
पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचा आणि अंधश्रद्धेचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या तपास सुरू असून आणखी पीडितांची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यासारख्या शिक्षणनगरीत घडलेला हा प्रकार अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या सुशिक्षित समाजाचा आरसा दाखवतो श्रद्धा आणि फसवणूक यातील सीमारेषा किती धूसर झाली आहे, याचं हे जिवंत उदाहरण मानलं जात आहे.
_____








