Crime news : माजी सरन्यायाधीशांच्या आईची फसवणूक करणाऱ्यास दणका !

 

Order to transfer case from Special Sessions Court cancelled : विशेष सत्र न्यायालयातून खटला वर्ग करण्याचा आदेश रद्द

Nagpur : माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे यांची १ कोटी ७४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपी तापस नंदुलाल घोषला मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विशेष सत्र न्यायालयातून खटला सामान्य सत्र न्यायालयात वर्ग करण्याचा आदेश अवैध ठरवत रद्द केला आहे.

फ्रेंड्स कॉलनीतील रहिवासी घोष हा सिजन्स लॉनचा केअरटेकर होता. या लॉनमधील कार्यक्रमांचे भाडे त्याने मुक्ता बोबडे यांच्याकडे जमा न करता अफरातफर केली. तब्बल १ कोटी ७४ लाख ३३ हजार २६१ रुपयांची ही फसवणूक २०२० मध्ये उघडकीस आली.

Weather updates : चक्राकार सक्रिय, महाराष्ट्रभर परतीच्या पावसाचा जोर !

या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी एफआयआर नोंदविला होता तर अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार स्वतंत्र खटला दाखल केला होता. आरोपीच्या मागणीवरून खटला सामान्य सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. मात्र ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने तो आदेश रद्द केला. या निर्णयामुळे आता पुढील खटला विशेष सत्र न्यायालयातच चालवला जाणार आहे.

_____