Criticism on DCM : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला

Sanjay Rauts attack on Ajit Pawar : संजय राऊतांचा अजित पवारांवर घणाघात

Mumbai : माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दम दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर आक्रमक शैलीत हल्लाबोल केला आहे.

“दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला आहे. आता उरलेला महाराष्ट्र त्यांच्या हस्तकांनी लुटावा म्हणून ते प्रशासनावर दबाव आणत आहेत, असा घणाघात त्यांनी केला. राऊत म्हणाले, “शिंदे-पवार यांच्याकडे असलेली माणसं म्हणजे चोर, डाकू, स्मगलर, बलात्कारी आहेत. यांना संरक्षण देण्यासाठीच सत्तेचा गैरवापर केला जातोय.

Adivasi Pardhi Family : आदिवासी पारधी कुटुंबावर सावकाराचा हल्ला, महिला गंभीर !

सुनील शेळके यांच्या मावळमधील बेकायदेशीर खनिजकर्म प्रकरण मी उघड केलं. त्यांनी कोट्यवधी रुपयांचा चुना सरकारला लावला आणि अजित पवार त्यांना संरक्षण देत आहेत. असंख्य लोक याच पद्धतीने वागत आहेत. ईडी, सीबीआयपासून पळण्यासाठी सगळ्यांना एकत्र करून बसवले आहे. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप मोदींनीच अजित पवारांवर केला होता. आता हेच पवार आयपीएस अधिकाऱ्यांना धमकावत आहेत. हाच त्यांचा शिस्तबद्धपणा आहे का?” असा टोलाही राऊतांनी लगावला.

राऊत म्हणाले, “एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला दम देणे म्हणजे बेकायदेशीर उत्खननाला थेट पाठिंबा देणे. मिस्टर अजित पवार, तुमची शिस्त कुठे गेली? तुम्ही अर्थमंत्री असूनही राज्याच्या तिजोरीला लुटलं जातंय आणि तुम्ही त्याचं संरक्षण करता आहात. हे राज्य कायद्याचं नसून चोरांचं राज्य बनवलं आहे.

तरुण अधिकार्‍यांना दबावाखाली बेकायदेशीर काम करायला सांगणं म्हणजे महाराष्ट्राच्या प्रशासनाला भ्रष्टाचाराची कीड लावणं आहे. या राज्याच्या मंत्र्यांनी आता तरी लाज वाटली पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Recruitment : अनुकंपा तत्वावरील 10 हजार जागा भरल्या जाणार

“दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र आधीच लुटला आहे. आता उरलेला महाराष्ट्र त्यांच्या हस्तकांकडून लुटवण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकला जातोय. यापुढे हे महाराष्ट्राला मान्य नाही,” असे ठाम विधान करून राऊतांनी अजित पवारांवर थेट निशाणा साधला.