Crop productiuon estimate paisewari : अकोला, वाशिमला न्याय; अमरावती, यवतमाळ, बुलढाण्यावर अन्याय?

Justice for Akola and Washim; injustice to Amravati, Yavatmal, and Buldhana : विभागाची ५२ पैसेवारी जाहीर; अकोला, वाशिम ५० पैशांच्या आत, तर बुलढाणा ५० पैशांच्या वर

Amravati सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तरीदेखील बाधित पिकांकडे दुर्लक्ष करून विभागीय आयुक्तांनी बुधवारी अमरावती विभागातील ७२३३ गावांची ५२ पैसेवारी जाहीर केली. या सोडतीत अकोला व वाशिम जिल्ह्यांना न्याय मिळाला असला तरी बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांवर अन्याय झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. खरीप हंगामातील प्रत्यक्ष स्थिती नोंदविण्याऐवजी महसूल प्रशासनाने दाखविलेली पैसेवारी शेतकऱ्यांच्या रोषाचे कारण ठरत आहे.

अमरावती विभागात यंदा ३१ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. सप्टेंबरअखेरपर्यंत किमान ११ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नदी-नाल्यांच्या पुरामुळे हजारो एकर शेती खरडून गेली, अनेक शेतांमध्ये गाळ साचला.

Shops to remain open for 24 Hours : चोवीस तास व्यापार, दुपटीने वाढेल रोजगार

मूग, उडीद हातचे गेले. सोयाबीनवर यलो मोझॅकचा प्रादुर्भाव आला. अतिपावसामुळे सोयाबीन पिवळे पडून शेंगांना कोंब फुटत आहेत. कपाशीवर पातेगळ व बोंडगळ आले. तुरीवर मर आले. अशा स्थितीत पैसेवारीत बाधित भागांना योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र “ऑल वेल” दाखवल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

जिल्हानिहाय नजरअंदाज पैसेवारी

अमरावती : ५६
अकोला : ४८
यवतमाळ : ५५
बुलढाणा : ५२
वाशिम : ४७
विभागीय सरासरी : ५२

Bacchu Kadu : विरोधक चुकीचे वागले म्हणून मी अध्यक्ष झालो, अल्पमत असूनही सत्ता आमच्याकडे


५० पैशांच्या आत – २८०५ गावे

अमरावती : १
अकोला : ९९०
यवतमाळ : ४३३
बुलढाणा : ५८८
वाशिम : ७९३

५० पैशांच्या वर – ४४२८ गावे

अमरावती : १९८३
यवतमाळ : १६१३
बुलढाणा : ८३२