Chief Ministers announcement, Akshay Kumar shared this serious experience : मुख्यमंत्र्यांची घोषणा, अभिनेता अक्षय कुमारनेही सांगितला गंभीर अनुभव
Mumbai : महाराष्ट्र सरकारने सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. आता शालेय स्तरावर, तिसऱ्या इयत्तेपासूनच विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेविषयी शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचं स्वरूप झपाट्याने बदलतं आहे. फक्त एक धडा शिकवून भागणार नाही, तर मुलांना सातत्याने सायबर सुरक्षेबाबत जागरूक करणारी एक संपूर्ण व्यवस्था उभी करणं आवश्यक आहे,” असं ते म्हणाले.
सायबर जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी मुंबईतील पोलिस मुख्यालयात फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृहमंत्रालयाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, अभिनेते अक्षय कुमार, अभिनेत्री राणी मुखर्जी, तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
Congress Levels Charges Against Ruling Front : मतांची चोरी सापडली, पण चोर अद्यापही फरार !
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमात ‘गोल्डन अवर’चे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “रस्ता अपघातात पहिला तास जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचा असतो, तसंच सायबर फसवणुकीतही सुरुवातीला तातडीने तक्रार केली तर फसवणुकीची रक्कम वाचवणं शक्य होतं. नागरिकांनी त्वरित 1930 किंवा 1945 या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा.”
अभिनेता अक्षय कुमार यांनी या प्रसंगी आपल्या मुलीबाबत घडलेला अनुभव शेअर केला. “माझी मुलगी ऑनलाइन गेम खेळताना अनोळखी व्यक्तीने तिला मेसेज करून अश्लील फोटो मागितले. सुदैवानं तिनं ही बाब आईला सांगितली आणि धोका टळला. पण प्रत्येकवेळी असं होईलच असं नाही. त्यामुळे शाळांमध्ये गणित-इतिहासाप्रमाणेच सायबर सुरक्षेचं शिक्षण बंधनकारक असावं,” अशी विनंती त्यांनी केली.
Dussehra Gathering : राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर तीन विचारांचा संगम !
फडणवीस यांनी सांगितलं की, “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे फिशिंग, ओटीपी फसवणूक, डीपफेक, आवाज व चेहरा क्लोनिंग यांसारख्या नवीन तंत्रांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोशल मीडियावर वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊन स्कॅम, एक्स्टॉर्शन आणि सायबर बुलिंगसारखे गुन्हे घडत आहेत. मात्र प्रत्येक गुन्ह्याचा डिजिटल फिंगरप्रिंट मागे राहतो आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगार शोधणं शक्य होतं.”
OBC Community’s Battle : सरकारने काहीही उत्तर दिले तरी ओबीसींचा मोर्चा निघणारच !
राज्यात आधीच सायबर सिक्युरिटी लॅब, प्रतिसाद केंद्रे आणि रेग्युलेटरी यंत्रणा उभारण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. “तंत्रज्ञान हाच धोका असला तरी त्यावर उपायही तंत्रज्ञानातच आहे. मात्र यासाठी वेळेवर तक्रार करणे आवश्यक आहे. जनजागृती हा सायबर गुन्हे टाळण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
या उपक्रमामुळे महाराष्ट्रात सायबर सुरक्षेच्या दिशेने एक नवा अध्याय सुरू होईल आणि शालेय शिक्षणात या विषयाचा समावेश होणं हा एक क्रांतिकारी बदल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
_____