India Meteorological Department warns of cyclone with rain : भारतीय हवामान विभागाचा पावसासोबत चक्रीवादळाचा इशारा
Mumbai : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आता आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. फक्त पावसाचेच नव्हे, तर चक्रीवादळाचेही मोठं संकट राज्यावर ओढवू शकतं. भारतीय हवामान विभागाने दोन दिवस ५५ किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यात दिवाळीनंतरही सतत रिमझिम ते जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात रात्रीपासून सुरू झालेला पाऊस सकाळपर्यंत कायम राहिला. अनेक भागांत अतिवृष्टीमुळे पाणी साचणे, भूस्खलन आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
Political Diwali Milan : किराणा पोहचला अन् भैया-भाभीवर ताई गरम!
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा रविवारी तीव्र होऊन ‘मोंथा’ चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवर जाणवणार आहे. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी ५५ किमी प्रतितासपर्यंत वाढू शकतो.
भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे की, “२५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रं सक्रिय राहतील. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील भागात अतिवृष्टी आणि जोरदार वारे यांचा धोका राहील.”राज्य सरकारने या संभाव्य चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी आपत्कालीन तयारी पूर्ण केली आहे.
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण आणि मुंबई परिसरात समुद्र किनाऱ्याजवळ जाणे टाळावे असा सल्ला देण्यात आला आहे. तटरक्षक दल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
मुंबईत रविवारी दिवसभर हवामान ढगाळ राहिलं, तर आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
कोकणात काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
कुलाबा हवामान केंद्रात रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान १४.६ मिमी पाऊस,
तर सांताक्रूझ केंद्रात ६.६ मिमी पाऊस नोंदवला गेला.
अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र आता नैऋत्य दिशेने सरकत असून, पुढील २४ तासांत मध्य अरबी समुद्र ओलांडणार आहे.
Local Bode Elections : बुलढाण्यातील नगराध्यक्षपदाची निवडणूक ‘हायप्रोफाईल’!
यामुळे कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर विभागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर राज्यातील हवामान कोरडे होण्याचा अंदाज आहे.








