Sambhaji Bhides criticism; He also attacked the Constitution : संभाजी भिडेंची टीका; संविधानावरही केले प्रहार
Sangli : सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौड कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी नवरात्रीतील दांडिया खेळावर टीका करत, दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा असल्याचे म्हटले. इतकेच नव्हे तर, त्यांनी भारतीय संविधान व देशातील लोकांविषयीही तीव्र शब्दांत मतप्रदर्शन केले.
भिडे म्हणाले, “आपली लायकी काय आहे ते त्या संविधानात लिहिलंय. आणि लोक ते वाचतातही पोटात मुरड आल्यासारखे. काय संविधान, कसले संविधान? भारत हा 1300 वर्षे मुस्लिम व युरोपियनांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेल्या लोकांचा देश आहे. ज्यांना लाज वाटत नाही, ज्यांना पारतंत्र्याची, गुलामीची लाज वाटत नाही त्या लोकांचा हा निर्लज्ज देश आहे.”
Jayashri Shelke : ३४०० रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ
यापूर्वी देखील भिडे यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. सर्वधर्म समभाव हा ना धड स्त्री, ना धड पुरुष असल्याचे सांगत त्यांनी त्याला नपुंसकपणा असे संबोधले होते. याशिवाय, आंबा खाल्ल्याने मूल जन्माला येते असा अजब दावा करून ते चर्चेत आले होते. या दाव्याबाबत न्यायालयीन खटला अद्याप सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
March is violent : ७ आदिवासी संघटनांच्या मूक मोर्चाला हिंसक वळण !
भिडे यांच्या या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नवरात्रीत मोठ्या प्रमाणावर दांडिया खेळला जातो. त्यावर थेट हल्ला चढवत भिडे यांनी केलेल्या विधानामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.