Bharanes reaction after taking charge as Agriculture Minister : कृषीमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भरणे यांची प्रतिक्रिया
Mumbai : कृषीमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली. एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खाते मिळते, यासारखा आनंद दुसरा नाही, असं ते म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. त्यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, नाविन्यपूर्ण शेतीला चालना मिळावी यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी या खातेबदलावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, कोकाटे यांच्या वादग्रस्त वर्तनाचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत होता. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. सरकारने त्याऐवजी त्यांचं खाते बदलण्याचा निर्णय घेतला. क्रीडा खात्याचीही जबाबदारी महत्त्वाची असून, कोकाटे यांनी ते चोखपणे पार पाडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Entry in Shinde group : तेजस ठाकरेसह 25 जणांचा शिंदे गटात प्रवेश
तसेच, कोणत्याही खात्यात गलथान कारभार झाल्यास सरकार जबाबदार असते. खातेबदल झाला म्हणजे सरकारची जबाबदारी संपली, असा गैरसमज सरकारने करून घेऊ नये. सर्व मंत्र्यांनी जबाबदारीने वागावे, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
Datta Bharne : अखेर खांदेपालट झालेच, कृषीखाते दत्ता भरणेंकडे
राज्याच्या कृषी खात्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून अखेर कृषी खाते काढून घेण्यात आले असून, त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकाटेंना आता भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा आणि युवक कल्याण खाते देण्यात आले आहे. काही दिवसांपासून कोकाटेंच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि विधिमंडळात रमी खेळण्याच्या प्रकरणामुळे ते सतत चर्चेत होते. अखेर सरकारने खातेबदल करत त्यांची उचलबांगडी केली आहे.








