Delhi blast case : ‘षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार…’

Prime Minister Narendra Modi warns from Bhutan over Delhi blast : दिल्लीतील स्फोटावर भूतानमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा

Delhi : देशाची राजधानी दिल्ली सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने हादरून गेली आहे. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणाऱ्या एका कारमध्ये सायंकाळी सुमारे 6.52 वाजता मोठा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर राजधानीतील सुरक्षा यंत्रणा पूर्ण सतर्क झाल्या असून दिल्ली पोलिस, स्पेशल सेल आणि एनएसजीच्या टीम्स अलर्ट मोडवर आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. भूतानमधूनच पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, “या षडयंत्रामागे जे कोणी आहेत, त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलली जातील. षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही. आमच्या एजन्सी या घटनेच्या मुळाशी जातील आणि दोषींना धडा शिकवला जाईल.” मोदींनी या स्फोटात मृत झालेल्या नागरिकांबद्दल शोक व्यक्त करताना सांगितले की, ते संपूर्ण रात्रभर तपास यंत्रणांशी संपर्कात होते आणि सर्व आवश्यक निर्देश दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, तपास जलद गतीने सुरू असून दोषींना कोणतीही माफी मिळणार नाही.

Delhi blast case : दिल्ली स्फोट प्रकरणात संशयित ताब्यात !

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी अत्यंत दुःखी मनाने भूतानमध्ये आलो आहे. 10 नोव्हेंबरच्या संध्याकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्या प्रत्येक कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे.” मोदींनी जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आणि शोकाकुल परिवारांना धीर दिला. त्यांनी सुरक्षा यंत्रणांना तातडीने आणि निष्पक्ष तपास करून आरोपींपर्यंत पोहोचण्याचे आदेश दिले आहेत.

Local Body Elections : उमेदवारांना परवानग्यांसाठी वन विंडो सिस्टीम !

दिल्ली बॉम्बस्फोटानंतरही पंतप्रधान मोदींनी आपला नियोजित भूतान दौरा कायम ठेवला आहे. या दौऱ्यादरम्यान ते भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेणार असून 1,020 मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांगचू-II जलविद्युत प्रकल्पाचे संयुक्त उद्घाटन करणार आहेत. तसेच, भूतानच्या 13 व्या पंचवार्षिक योजनेसाठी भारताकडून सहकार्याबाबत चर्चा होईल. मोदी भूतानला 1,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करतील आणि देशाच्या विकासासाठी अनेक प्रकल्पांवर स्वाक्षऱ्या होतील.

Dhantoli Building Scam : नझुल आणि मनपा अधिकाऱ्यांचे बिल्डरशी संगनमत उघड !

दरम्यान, दिल्लीतील या स्फोटामुळे राजकीय वर्तुळातही हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर भूतान दौऱ्यावर जाण्याबद्दल टीका केली असली तरी मोदींनी स्पष्ट केलं की, देशाच्या सुरक्षेशी संबंधित कोणत्याही विषयावर सरकार पूर्ण गंभीर आहे आणि दोषींना शिक्षा होईपर्यंत विश्रांती घेणार नाही.

ही घटना केवळ दिल्लीपुरती मर्यादित नसून, देशाच्या सुरक्षेला दिलेला एक गंभीर इशारा आहे. त्यामुळे तपास यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत असून पंतप्रधानांच्या निर्देशानुसार प्रत्येक संशयितावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. दिल्लीतील नागरिकांमध्ये मात्र या घटनेनंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

_______