Farmer recorded video before committing suicide : कर्जमाफीची वाट बघून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची आर्त हाक
Ahilyanagar : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस फुगतच चालला आहे. त्यातच या आठवड्यात झालेल्या अतिवृ्ष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून टाकले आहे. आता शेतकऱ्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे. महायुती सरकारने वचन देऊनही अद्याप कर्जमाफीची घोषणा केलेली नाही. आज ना उद्या कर्जमाफी मिळेल या आशेवर असलेले अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब सरोदे वाट बघून कंटाळले आणि अखेर त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
बाबासाहेब सरोदे हे अल्पभूधारक शेतकरी होते. गेल्या हंगामाचे कर्ज फेडू शकले नव्हते. त्यातच यावेळी झालेल्या अतिवृष्टीने त्यांच्या पिकाचे पूर्णतः नुकसान झाले. हा धक्का ते सहन करू शकले नाही आणि मृत्युला कवटाळले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला होता. ‘आज ना उद्या कर्जमाफी मिळेल, अशी आशा होती. पण आता ती आशा मावळली. मायबाप सरकारकडून योग्य वेळी मदत मिळाली असती तर जगलो असतो. पण आता जगण्याचा आत्मविश्वास उरला नाही. जिवंतपणी मला सरकारकडून मदत मिळाली नाही. मी मेल्यावर तरी शेतकऱ्यांना मदत करा’, असे सरोदे यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.
Farmer loan waiver : शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवारांचे महत्त्वाचे विधान!
हे वृत्त पसरल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सरकार आपल्या स्तरावर प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने २० हजार कोटी रुपयांचा भार उचललेला आहे. लाडक्या बहीणींसाठी ४५ हजार कोटींची तरतूद केली आहे. या लाडक्या बहीणीसुद्धा शेतकऱ्यांच्या घरातील आहेत. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचे सरकारचे काम सुरू आहे. योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करूच. पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये.
Women Commission : महायुती सरकार देवासारखं, महिला आयोग परिषदेत वक्तव्य
काही काळापूर्वी ‘कर्जमाफीचे वचन मी दिलेच नव्हते’, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. अन् आता तेच ‘योग्य वेळी कर्जमाफी करू’, असे बोलत आहेत. त्यामुळे अजित दादांची नेमकी भूमिका काय, हे कळेनासे झाले आहे.








