Chief Minister Devendra Fadnavis warns of action against Maharashtra Navnirman Sena workers : कारवाई करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी भाषा वापरण्याचा आग्रह केला जात आहे. त्यासाठी मनसेकडून ‘खळ खट्ट्याक..’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे पूर्णतः चुकीचे आहे. मराठी भाषेचा आग्रह असणे चुकीचे नाही. मात्र त्यासाठी कायदा हाती घेऊ नये. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषा वापरणे आवश्यक आहे, त्या ठिकाणी ती वापरली गेली पाहिजे, असा आग्रह असलाही पाहिजे. मात्र त्यासाठी कायदा हातात घेणे हे पूर्णतः चुकीचं आहे. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये. अन्यथा कारवाईला सामोरे जावेच लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्याने कर्नाटक रक्षण वेदिकेचा मनसेच्या या आंदोलनाला पाठिबा मिळाला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी कर्नाटक लक्षण वेदिकेचे आभार मानले आहेत.
MLA Nitin Deshmukh : शिवसेना जिल्हाप्रमुखांसाठी आमदार उतरले मैदानात!
मनसेच्या मारहाणीचे समर्थन नाही..
मराठी भाषेचा वापर केला जावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक आक्रमक झाले आहेत. त्यासाठी त्यांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले आहेत. मनसेने केलेल्या मारहाणीचे समर्थन करणार नाही. पण मराठीचा अवमानही सहन करणार नाही. असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
Mahayuti Government : पीकविमा योजनेतील नुकसानाची ट्रिगर अट हटवण्याची शिफारस
बॅंकेचे मुख्यमंत्र्यांना पत्र..
मनसेकडून बॅंकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. ज्या बॅंका कायद्याचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. तर सुरक्षेसाठी बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले आहे. मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र बॅंक ऑफीसर्स असोसीएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रातून केली आहे.