Chief Minister will break the tyranny in Pune : काही लोक पक्षाचे नाव घेऊन दादागिरी करतात
Nagpur : पुण्याच्या उद्योगांमध्ये दादागिरी चालते, हे नेहमीच बोलले जाते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही गोष्ट कबूल केली आहे. पुण्याच्या उद्योगांमध्ये हा प्रकार सर्रास बघायला मिळतो. त्यासाठी सर्व नेत्यांना एकमत करावे लागेल. विविध राजकीय पक्षांचे लोक आपापल्या पक्षाचे नाव घेऊन दादागिरी करतात. ही दादागिरी मी मोूडन काढणार आणि जो यामध्ये मदत करेल, त्याचे स्वागत करणार, असे फडणवीस म्हणाले.
मराठी भाषेच्या संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात मराठी शिकलीच पाहिजे, ती अनिवार्य असलीच पाहिजे, हे माझं पक्कं मत आहे. पण महाराष्ट्रातील मराठी मुलांना मराठीसोबत अजून एक भारतीय भाषा शिकायला मिळाली तर त्यात वावगं काय आहे? आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी भाषेसाठी पायघड्या घालायच्या, या मानसीकतेला माझा विरोध आहे.
मनसेच्या आंदोलनांसंदर्भात बोलताना, तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत असाल, तर तुम्हाला अटक होईल. आणि तुम्ही तसे करत नसाल तर अटक करण्याचे कुठलेही कारण नाही. जे लोक कायद्याच्या विरोधात जातात, त्यांच्याकरिता कायदा आहे. कायदा आंदोलकांच्या विरोधात नाही. अगदी सरकारच्या विरोधातही बोलण्याची मुभा आपल्या राज्यात आहे. त्यामुळे त्यांनी केलेले कमेंट्स कायदा न वाचता केलेले आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Bomb blast case : बॉम्बस्फोट आपोआप होत नाहीत; मग ते करणारे कोण?
नागपूरची दिव्या देशमुख हिने जागतिक बुद्धीबळ स्पर्धा जिंकली आहे. त्यासाठी तिचा महाराष्ट्र सरकारच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. तीन कोटी रुपयांचा पुरस्कार महाराष्ट्र सरकारने दिव्याला दिला आहे. केवळ १९ वर्षांची कन्या दिव्या हिने पहिली ग्रॅंडमास्टर महिला होण्याचा बहूमान पटकावला. पुढील काळात तिच्याकडून भारताला खूप अपेक्षा आहेत. दिव्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंचावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फढणवीस यांनी व्यक्त केला.