Breaking

Devendra Fadanvis : असा होणार तिर्थक्षेत्रांचा विकास, मुख्यमंत्र्यांनी सांगितले नियोजन !

 

How the development of pilgrimage sites will be done, the Chief Minister Devendra Fadanvis said planning : ग्रामविकास तसेच पर्यटन विभागाने सुधारित नियमावली करावी

Mumbai : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी ग्रामविकास व पर्यटन विभागाने सुधारित नियमावली करावी जेणेकरून राज्यातील भागनिहाय महत्व लक्षात घेवून सर्वसमावेशक प्रस्ताव जिल्ह्यांकडून सादर होतील, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधानभवन येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम, संजय देशमुख, आमदार सई प्रकाश डहाके यांच्यासह विविध देवस्थान मंदिराचे कार्यवाह उपस्थित होते.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील गुरूमंदिर तीर्थक्षेत्रासाठी १७० कोटी तर श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रकल्प १ व प्रकल्प २ अश्या एकूण ७२३ कोटी रूपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीत मंजुरी देण्यात आली.

CM Devendra Fadnavis : कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावल्यास याद राखा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील गुरूमंदिर तीर्थक्षेत्र विकास आणि श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रकल्प १ व प्रकल्प २ च्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. ही कामे गतीने करण्यासाठी संबधित विभागांनी कार्यवाही करावी. नागपूर येथील नंदनवन ले-आऊट येथील लक्ष्मीनारायण व शिव मंदिर परिसराचे सुशोभिकरण व पुर्नविकास करणे,नागपूर भांडेवाडी येथील श्री मुरलीधर मंदीर तीर्थक्षेत्राचा विकास करणे तसेच नागपूर शांतीनगर इतवारी रेल्वे स्टेशनजवळील कुत्तेवाला आश्रमाचे सुशोभिकरण आणि विकास करण्याबाबत कामांना उच्च स्तरीय समितीने मान्यता दिली.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे सादर करताना कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाची कामे करण्यासाठी प्रशासनाने भर द्यावा.कोणताही प्रस्ताव सादर करताना भविष्यातील गरजा आणि त्या परिसरातील आवश्यकता लक्षात घेवून प्रस्ताव सादर केले जावेत. ग्रामविकास तसेच पर्यटन विभाग त्याचप्रमाणे या विषयाशी संबधित इतर विभागांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा बनविताना नवीन मार्गदर्शक सूचना जारी करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.

CM Devendra Fadnavis : Creative तरुणांसाठी खुशखबर! IIT च्या धर्तीवर मुंबईत आता IICT

या बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के. एच.गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे,सचिव डॉ.श्रीकर परदेशी, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी,दूरदृश्यप्रणालीव्दारे वाशिमच्या जिल्हाधिकारी एस.भुवनेश्वरी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.