Nitin Gadkari got energy from Bhanutai’s teachings : गरीबांना आरोग्यासह सर्व सेवा मिळण्यासाठी यशस्वी प्रयत्न
Nagpur : आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित स्व. भानुताई गडकरी डायग्नोस्टिक सेंटरमुळे गरीबांसाठी सेवेचे एक दालन खुले झाले आहे. भानुताई गडकरी यांनी कायमच समाजासाठी सकारात्मक काम केले. त्यांचे संस्कार नितीन गडकरी यांच्यावर झाले. त्यांच्यामुळेच आज ते समाजसेवेत नवनवीन संकल्पना राबवत आहेत, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागपूरच्या लष्करीबाग येथील कमाल चौक परिसरात स्व. भानुताई गडकरी डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण आज (२७ जुलै) मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, नितीन गडकरी यांनी यशस्वी मंत्री म्हणून राज्यात आणि देशात काम केले आहे. हे करताना त्यांनी स्वतःचं आणि देशाचं नाव मोठं केलं आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्याचा त्यांनी सदैव प्रयत्न केला. त्यांना गरीबांची सेवा करायला आवडतं. गरीबांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा आणि इतर सेवा मिळाव्या, यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. कुणाचे ऑपरेशन किंवा कुणी आरोग्य विषय समस्या घेऊन गडकरींकडे गेल्यास ते नेहमीच मदत करतात.
Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना यावर्षीचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’
स्व. भानुताई गडकरी डायग्नोस्टिक सेंटर देशातील एकमेव मेड इन इंडिया मशीन्स असणारे सेंटर आहे. आमच्या मेड इन इंडिया मशीन्सची किंमत कमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना कमी दरात उपचार मिळणार आहेत. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आता जसजसा विकास होतो आहे, तसतशा मशीन्स वाढत आहेत. आधी अशा मशीन्स अमेरिकेतून आणाव्या लागत होत्या, त्यामुळे त्या महाग पडत होत्या. आता आपल्याकडे स्वस्तात उपलब्ध होतात.
Maharashtra Government : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत दीड लाख बेरोजगारांची थट्टा !
आम्ही महात्मा फुले योजना सुरू केली. यातून पाच लाख रुपयांचे मोफत उपचार सुरू केले. यामध्ये आणखी सुविधा वाढवण्याची गरज आहे. यासाठी फक्त सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही, तर समाजानेही पुढे आलं पाहिजे. महाराष्ट्रात प्राथमिक आरोग्य सेवेत आपण थोडे मागे आहोत. आता प्रति तीन किलोमीटर अंतरावर ही सेवा देता येईल, याचा प्लॅन आम्ही तयार केला आहे. यामध्ये केंद्र सरकारचीही मदत घेऊ. पुढील चार वर्षांत देशातील सर्वोत्तम आरोग्य सेवा महाराष्ट्रात राहील, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही नितीन गडकरी यांचेही मार्गदर्शन घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.